क्रेटा, विटारा, अर्टिगा, बलेनो, स्विफ्ट, डिझायर नाही; 'या' केवळ ₹5.62 लाखांच्या SUVचा परदेशात डंका, बनली नं.१!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:40 IST2026-01-29T18:39:02+5:302026-01-29T18:40:10+5:30
ग्राहकांच्या या मागणीसमोर वरना, हायरायडर, जिम्नी, ग्रँड i10, डिझायर, ऑरा, स्विफ्ट, फ्रँक्स, बलेनो, अर्टिगा आणि क्रेटा यांसारख्या सर्व लोकप्रिय मॉडेल्स फिके पडले. महत्वाचे म्हणजे, या कारची सुरुवातीची किंमत केवळ ५.६२ लाख रुपये एवढी आहे.

क्रेटा, विटारा, अर्टिगा, बलेनो, स्विफ्ट, डिझायर नाही; 'या' केवळ ₹5.62 लाखांच्या SUVचा परदेशात डंका, बनली नं.१!
देशांतर्गत बाजारात ज्या कार कंपन्या आणि त्यांच्या मॉडेल्सचा दबदबा दिसतो, त्या कार कंपन्या देशाबाहेर मात्र बऱ्याच मागे दिसतात. डिसेंबर महिन्यातील कार निर्यातीची (Car Export) आकडेवारी बघता, एका अशा कारने परदेशात आपला डंका वाजवला, जीचे नाव जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही कार आहे निसान मॅग्नाइट (Nissan Magnite). ही कार गेल्या महिन्यात निर्यात यादीत पहिल्या क्रमांकावर राहिली. महत्वाचे म्हणजे, परदेशी ग्राहकांवर या कारची जादू अशी काही चालली की, त्यांनी तब्बल ९२६८ युनिट्स खरेदी केले. ग्राहकांच्या या मागणीसमोर वरना, हायरायडर, जिम्नी, ग्रँड i10, डिझायर, ऑरा, स्विफ्ट, फ्रँक्स, बलेनो, अर्टिगा आणि क्रेटा यांसारख्या सर्व लोकप्रिय मॉडेल्स फिके पडले. महत्वाचे म्हणजे, या कारची सुरुवातीची किंमत केवळ ५.६२ लाख रुपये एवढी आहे.
अशी आहे काही मुख्य मॉडेल्सच्या निर्यातीची आकडेवारी (डिसेंबर २०२५ विरुद्ध डिसेंबर २०२४) -
डिसेंबर २०२५ मधील निर्यातीच्या आकडेवारीचा विचार करता, मॅग्नाइटच्या ९,२६८ युनिट्सची विक्री झाली, जी डिसेंबर २०२४ मध्ये २,५७० युनिट्स एवढी होती. ह्युंदाई वरनाची निर्यात ६,१२५ युनिट्स, जी २०२४ मध्ये ४,०५४ होती. टोयोटा हायरायडरच्या ५,१६४ युनिट्सची विक्री झाली, जी २०२४ मध्ये ४,६४२ एढी होती. तर मारुती जिम्नीच्या ४,५९२ युनिट्सची निर्यात झाली, जी २०२४ मध्ये ४,६९९ होती. या शिवाय, ग्रँड i10 ची निर्यात ४,२३४ युनिट्स एवढी होती, जी २०२४ मध्ये ४,०७२ एवढी होती. याच बरोबर, निसान सनीच्या डिसेंबर २०२५ मध्ये ४,२०२ युनिट्सची विक्री झाली, गेल्या वर्षी याच काळात ती ६,९८८ होती.
मारुती डिझायरच्या निर्यातीत मोठी वाढ होऊन ती ३,४८९ युनिट्सवर पोहोचली, जी २०२४ मध्ये ५६४ होती. ह्युंदाई ऑराच्याही ३,२६१ युनिट्स विकल्या गेल्या, २०२४ मध्ये हिच्या २,४२३ युनिटचीच विक्री झाली होती. तर ई-विटाराच्या २,७२४ युनिट्सची निर्यात झाली. स्विफ्टच्या निर्यातीत मोठी घट होऊन ती २,३९५ युनिट्सवर आली आहे, जी २०२४ मध्ये ७,२४३ वर होती. तर फ्रँक्सची निर्यात २,३९० युनिट्स राहिली, जी २०२४ मध्ये ८३७३ होती.
याशिवाय, इतर मॉडेल्समध्ये २०२५ मध्ये मध्ये एस-प्रेसो २,२२९ युनिट्स, बलेनो २,१९९ युनिट्स, सेलेरियो २,०२९ युनिट्स आणि अर्टिगा १,७०५ युनिट्स, होंडा सिटीची १,६७७ युनिट्स, किया कॅरेन्स १,००१ युनिट्स, महिंद्रा XUV 3XO ९९९ युनिट्स, क्विड ९८९ युनिट्स, सोनेट ९६६ युनिट्स आणि ग्रँड विटारा ८४९ युनिट्स, अशी निर्यात झाली.