शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

या ३ मारुती कारची बाजारात धूम, शोरूममध्ये पोहोचण्यापूर्वीच खरेदी करतायत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 10:10 IST

मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या तब्बल 7 मॉडेल्सचा समावेश आहे, याशिवाय, टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि महिंद्राच्या प्रत्येकी एका मॉडेलचा समावेश आहे.

देशीतील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने मे २०२४ मध्येही सर्वाधिक कारची विक्री केली आहे. महत्वाचे म्हणजे, मे महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप १० कारच्या यादीत मारुती सुझुकीच्या तब्बल ३ मॉडेल्सचा समावेश आहे, याशिवाय, टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि महिंद्राच्या प्रत्येकी एका मॉडेलचा समावेश आहे. तर जाणून घेऊयात मे २०२४ मध्ये विक्री झालेल्या मारुती सुझुकीच्या टॉप ३ कारसंदर्भात... 

मारुती सुझुकी स्विफ्ट -मारुती सुझुकीची स्विफ्ट ही मे २०२४ मध्ये कंपनीचीच नव्हे तर, ओव्हरऑल सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. मे महिन्यात या कारच्या एकूण १९,३९३ युनिट्सची विक्री झाली आहे. मे २०२३ चा विचार करता हा आकडा १७,३४६ युनिट्स एवढा होता. अर्थात या कारच्या विक्रीत एका वर्षात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे, स्विफ्टला अलिकडेच एक अपडेट मिळाले आहे. यामुळे ही आत आता नवीन १.२-लिटर तीन-सिलेंडर इंजिनसह येते. जे ८०bhp जनरेट करते.

मारुती सुझुकी डिझायर -गेल्या महिन्यात मारुती सुझुकी डिझायर ही मारुतीच्या पोर्टफोलिओतील दुसोऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली. मारुतीने हिच्या १६,०६१ युनिट्सची विक्री केली. मे २०२३ चा विचार करता, तेव्हा हिच्या ११,३१५ युनिट्सची विक्री झाली होती. यानुसार या कारच्या विक्रीत तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिझायर १.२-लीटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. जे ८९bhp पॉवर जनरेट करते. यात सीएनजीचे ऑप्शनही मिळते. यावर इंजिन ७६bhp जनरेट करते.

मारुती सुझुकी वॅगन आर -ही कार विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या महिन्यात हिच्या एकूण १४,४९२ युनिट्सची विक्री झाली. तर मे २०२३ चा विचार करता, हिच्या एकूम १६,२५८ युनिट्सची विक्री झाली होती. अर्थात, हिच्या विक्रीत ११ टक्क्यांची वार्षिक घट झाली आहे. वॅगन आर ६६bhp च्या १.०-लीटर पेट्रोल इंजिन आणि ८९bhp च्या १.२-लीटर पेट्रोल इंजिन ऑप्शनसह येते. सीएनजी ऑप्शनमध्येही ही कार उपलब्ध आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारMarutiमारुती