शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
3
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
4
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
5
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
6
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
7
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
8
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
9
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
10
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
11
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
12
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
13
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
14
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
15
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
16
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
17
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
18
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
19
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
20
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Pure ecoDryft 350 : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच, सिंगल चार्जमध्ये 171 किमीपर्यंत रेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 13:49 IST

ही इलेक्ट्रिक बाईक कंपनीच्या अधिकृत डीलर्समार्फत बुक केली जाऊ शकते. 

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्युअर ईव्हीने (Pure EV) ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) लाँच केली आहे.  Pure ecoDryft 350 असे या बाईकचे नाव आहे. ही इलेक्ट्रिक बाईक कंपनीच्या अधिकृत डीलर्समार्फत बुक केली जाऊ शकते. 

जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक बाईक  खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला ही नवीन बाईक आवडेल. कारण, ही बाईक कमी किमतीत चांगली ड्रायव्हेबिलिटी रेंज देते, असा दावा कंपनीचा आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, Pure ecoDryft 350 बाईकमुळे ग्राहकांना महिन्याला 7 हजार रुपयांची बचत करता येईल. तसेच ही बाईक तीन वेगवेगळ्या मोड्समध्ये मिळेल. 

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कंपनीने 3.5kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी 6 MCU आणि 4 hp इलेक्ट्रिक मोटरसह येते. तसेच, या बाईकसोबत तुम्हाला 75 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळेल, जो 40Nm चा टॉर्क जनरेट करेल. ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाल्यास फुल चार्ज केल्यावर 171 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. या इलेक्ट्रिक बाईरमध्ये रिव्हर्स मोड, हिल स्टार्ट असिस्ट ते डाउन हिल असिस्ट आणि पार्किंग असिस्ट अशी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत. 

कंपनीचे म्हणणे आहे की, स्टेट ऑफ चार्ज आणि स्टेट ऑफ हेल्थनुसार, बाईकची स्मार्ट एआय टेक्नॉलॉजी दीर्घ बॅटरीचे आयुष्य सुनिश्चित करते. या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख 30 हजार रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, या किमतीत ही बाईक होंडा शाइन, हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना यांसारख्या प्रवासी बाईक्स आणि हॉप ऑक्सो सारख्या इलेक्ट्रिक बाइक्सशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईकAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग