शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:25 IST

CNG Crisis: ‘सीएनजी’च्या तुटवड्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीसह स्कूल बससेवेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: महामुंबईत सीएनजी गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅसच्या आरसीएफ परिसरातील मुख्य पुरवठा पाइपलाइनचे नुकसान झाल्याने अनेक पंपावरील गॅस पुरवठा बंद होता. याचा परिणाम खासगी प्रवासी वाहतूक आणि स्कूलबसवर झाला. या ‘गॅसकोंडी’मुळे सोमवारी ४० ते ४५ टक्के रिक्षा, टॅक्सी सेवा बंद होती. तर काही वाहन चालकांनी सीएनजीच्या तुलनेत महाग असलेले पेट्रोल भरत प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. परिणामी मुंबईकरांचे मोठे हाल झाले. तसेच अनेक ठिकाणी पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र संपूर्ण महामुंबईत होते.

रविवारपासून वडाळा स्टेशनमधून मुंबईतील सीएनजी पंपांवरील थेट गॅस पुरवठा बंद झाला आहे. ‘सीएनजी’च्या तुटवड्यामुळे सोमवारी मुंबईतील खासगी वाहनांसह रिक्षा, मीटर टॅक्सी, ऑनलाइन टॅक्सी आणि स्कूल बससेवेला मोठा फटका बसला. ‘सीएनजी’वरील हजारो वाहने रस्त्यावर उतरलीच नाहीत. नोकरदार वर्ग, विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. तर रिक्षा, टॅक्सीचालकांना व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. 

महानगरकडून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ३९८ सीएनजी पंपांवर गॅस पुरवठा केला जातो. महामुंबईत सुमारे ९ लाखांपैकी चार ते साडेचार लाख रिक्षा, ३८ हजार टॅक्सी, २ हजार शालेय बस, चार लाख खासगी चारचाकी वाहनांचा समावेश आहे. बेस्टच्या सीएनजी बसच्या फेऱ्यांवर मात्र काहीही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

ठाण्यात प्रवाशांच्या नशिबी पायपीट

ठाणे शहरात २० हजारांहून अधिक रिक्षा, तसेच ऑनलाइन ॲपद्वारे खासगी गाडीतून प्रवास करणाऱ्या हजाराे प्रवाशांचे साेमवारी सुद्धा खूप हाल झाले. सीएनजी पंपांवर इंधन भरण्यासाठी रिक्षांच्या दिवसभर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हजारो ठाणेकरांना पायपीट करून घर व कार्यालय गाठावे लागले. ठाणे शहरातील माजिवडा, वागळे इस्टेट, काेपरीतील आनंदनगर, खाेपट आणि कॅसलमिल येथील गणेश पेट्राेलियम आदी ११ सीएनजी पंपांवर रिक्षा, तसेच खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

४५ टक्के बंद

सोमवारी ४० ते ४५ टक्के रिक्षा, टॅक्सी सेवा बंद होती.  रविवारी काही ठिकाणी सीएनजी उपलब्ध झाल्याने रिक्षा, टॅक्सीचालकांनी तो भरून ठेवला. त्यामुळे सोमवारी दुपारनंतर काही रिक्षा, टॅक्सी, पेट्रोलवर शेअरिंग रिक्षा, टॅक्सी सुरू होत्या. संध्याकाळनंतरही बंद झाल्या. 

दुरुस्ती लवकरच

पाइपलाइनच्या दुरुस्तीनंतर सीजीएस वडाळा येथे पुरवठा पूर्ववत झाला की, एमजीएलच्या नेटवर्कमधील गॅस पुरवठा सामान्य होईल. मंगळवारी दुपारपर्यंत गॅस पुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.- महानगर गॅस  

English
हिंदी सारांश
Web Title : CNG Shortage Cripples Mumbai: Transport Disrupted, Commuters Stranded.

Web Summary : A major CNG pipeline disruption severely impacted Mumbai, Thane, and Navi Mumbai, halting 45% of taxis and rickshaws. Commuters faced hardship as CNG pumps ran dry, forcing reliance on expensive petrol. Repairs are underway, with supply expected to normalize soon.
टॅग्स :MumbaiमुंबईthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र