BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:43 IST2025-09-14T14:41:46+5:302025-09-14T14:43:01+5:30

GST 2.0: कोणत्या मॉडेलवर किती रुपयांची बचत होणार, जाणून घ्या..!

Prices of BMW cars and bikes have fallen; you will save a whopping ₹13.6 lakh | BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

GST 2.0: BMW इंडियाने आपल्या अनेक कार आणि बाईक्सच्या किमतींमध्ये मोठी कपात जाहीर केली आहे. नवीन GST स्लॅब लागू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी २२ सप्टेंबर २०२५ पासून होणार आहे. कंपनीने सांगितले की, या निर्णयाचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. सणांचा हंगाम खास बनवण्यासाठी विशेष ऑफर्सही दिल्या जात आहेत. महत्वाचे म्हणजे, किमतींमध्ये कमाल १३.६ लाख रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.

बाईक्सच्या किमतीही कमी झाल्या
हा बदल बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया, मिनी इंडिया आणि बीएमडब्ल्यू मोटोराडच्या अंतर्गत येणाऱ्या मॉडेल्सवर लागू होणार आहे. कार सेगमेंटमध्ये अनेक बीएमडब्ल्यू मॉडेल्स व मिनी कूपर एस यांचा समावेश आहे, तर दुचाकी सेगमेंटमध्ये G 310 RR व C 400 GT बाईक्सच्या किमतींमध्ये कपात झाली आहे.

प्रमुख मॉडेल्सवरील नवी किंमत (२२ सप्टेंबर २०२५ पासून लागू)

मॉडेलव्हेरिएंटजुनी किंमतनवी किंमतकिंमत फरक
BMW 2 Series Gran Coupe218i M Sport₹46,90,000₹45,30,000₹1,60,000
BMW 3 Series LWB320Ld M Sport₹65,30,000₹61,75,000₹3,55,000
BMW 5 Series LWB530Li M Sport₹76,50,000₹72,35,000₹4,15,000
BMW 7 Series LWB740i M Sport₹1,89,70,000₹1,79,45,000₹10,25,000
BMW X1sDrive18d M Sport₹55,90,000₹52,15,000₹3,75,000
BMW X3xDrive20d M Sport₹78,30,000₹73,10,000₹5,20,000
BMW X5xDrive40i₹1,00,30,000₹93,60,000₹6,70,000
BMW X7xDrive40d M Sport₹1,38,40,000₹1,29,15,000₹9,25,000
BMW Z4M40i₹92,90,000₹87,90,000₹5,00,000
BMW M2M2₹1,06,00,000₹1,00,25,000₹5,75,000
BMW M4Competition₹1,61,00,000₹1,52,30,000₹8,70,000
BMW M8M8₹2,52,00,000₹2,38,40,000₹13,60,000
BMW XMXM₹2,60,00,000₹2,54,55,000₹5,45,000

(इतर अनेक मॉडेल्सच्या किमतीही कमी झाल्या आहेत.)

कंपनीने काय म्हटले?
कंपनीच्या मते, सणांच्या हंगामात बीएमडब्ल्यू कार खरेदी करणे हे एक अविस्मरणीय अनुभव असतो. यंदा ग्राहकांना डबल फायदा मिळणार आहे. एकीकडे BMW Smart Finance मार्फत एक्सक्लूसिव्ह फायनान्शियल ऑफर्स, तर दुसरीकडे GST 2.0 मुळे एक्स-शोरूम किंमतींमध्ये १३.६ लाख रुपयांपर्यंतची घट झाली आहे. नवीन खरेदीदारांना या कपातीचा व ऑफर्सचा मोठा लाभ मिळणार आहे.
 

Web Title: Prices of BMW cars and bikes have fallen; you will save a whopping ₹13.6 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.