शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

१२५ सीसी क्षमतेच्या स्कूटरमध्ये सध्या बऱ्यापैकी पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 3:29 PM

१२५ सीसी ताकदीच्या स्कूटर्समध्ये सध्या ग्रॅझिया, व्हेस्पा व सुझुकी अॅक्सेस या तीन स्कूटर्स बाजारात पर्याय म्हणून राहाता येता. ऑटोगीयरच्या स्कूटरच्या जमान्यामध्ये स्कूटर म्हणजे सुलभ आरामदायी पर्याय म्हणून दुचाकीचालक त्याकडे पाहातात.

शहरांमध्ये स्कूटर हा दळणवळणाचा एक चांगला पर्याय ठरला आहे. सामान वाहून नेण्याची क्षमता, हेल्मेट ठेवण्याची सुविधा आणि महिलांनाही चालवण्यासाठी सुलभता या तीन गुणांमुळे सध्याच्या स्कूटर्स या ग्राहक उपयोगी झालेल्या आहेत. त्यातही आता १२५ सीसी इंजिनक्षमतेच्या स्कूटर्स या या आधीच्या ११० सीसी वा १०० सीसी क्षमतेपेक्षा काही जास्त ताकदीच्या व इतके असूनही बऱ्यापैकी मायलेज देणाऱ्या असल्याने लोकांचा कलही त्याकडे वळला आहे. होंडा अॅक्टिव्हा १२५ सीसी स्कूटरीनंतर सध्या नवा पर्याय म्हणून होंडाची ग्रॅझिया, सुझुकीची अॅक्सेस व व्हेस्पा या तीन स्कूटर्स १२५ सीसी मध्ये पर्याय आहेत.सध्या होंडा  अॅक्टिव्हा अधिक खपाची असल्याचे दिसते खरी परंतु १२५ सीसी ताकदीच्या स्कूटरमध्ये सुझुकी एक्सेसने बाजी मारलेली आहे. त्यामुळे होंडानेही आता ग्रॅिझया ही १२५ सीसी ताकदीची स्कूटर बाजारात आणली आहे, बाजारात आणखी एक १२५ सीसी ची स्कूटर आहे ती म्हणजे व्हेस्पा. मात्र या तीनही वेगळ्या कंपन्यांच्या स्कूटरमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विशेष करून लूकमध्ये फरक दिसतो. त्यामध्ये व्हेस्पा ही स्कूटर मात्र रचना व आरेखनातही पूर्ण वेगळी आहे. व्हेस्पा ही स्कूटरमध्ये सर्वात महाग असणारी स्कूटर आहे. इटालियन थीमवर तयार केलेल्या या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे या स्कूटरची बॉडी ही ट्युब्यूलर नाही. तसेच तिचा लूक क्लासिक आहे. व्हेस्पावरून प्रवास तसा स्मुथ वाटावा असा आहे, स्कूटरला एक स्थिरता आहे, कारण इंिजन वबॉडी यांच्यामध्ये लींक िस्प्रंग तंत्र वापरले आहे. त्यामुळे वेग कोणताही असला तरी आरामात चालते. या स्कूटरला पुढील चाक ११ इंच टायरचे असून मागील १० इंच टायरचे आहगे मात्र शॉकअब्ज चांगले असल्याने छोट्या खड्ड्यांवरून जाताना त्रास होत नाही. मात्र हिची किंमत सुमारे ७० हजार रुपयांपासून सुरू होते.व्हेस्पा - स्लीम रचनेची व सौंदर्यपूर्ण. क्लासीक लूक असणारी ही स्कूटर असून आसन व हँडल यांच्या रचनेमुळे काहीशी अधिक आरामदायी. डिजिटल स्पीडोमीटर स्कूटरमध्ये प्रथम व्हेस्पाला वापरला गेला होता. पूर्ण पत्रा बॉडी, मोनोकॉक रचना असल्याने अधिक मजबूत व एकसंघता वाटते. १० बीएचपी ताकद.होंडा ग्रॅझिया -  अॅक्टिव्हा १२५ च्याच पद्धतीचा वापर केला असा तरी स्पोर्टी लूक व नव्या सुविधा यात आहेत.यामध्ये एलईडी हेडलॅम्प, स्टायलिश बनवण्याचा प्रयत्न. ट्यूब्युलर स्टील चासी व फायबरबॉडीचा वापर. कॉम्बी ब्रेक, ८.५ बीएचपी ताकद.सुझुकी एक्सेस - काहीशी वेगळा लूक देण्यात आला असून इंडिकेटरची रचना, स्विचचे फिनिशिंग, ट्यूब्युलर स्टील चासी व फायबरबॉडी, आसन व्यवस्था सपाट असल्याने रूंदी चांगली वाटते. ८.७ बीएचपी ताकद.या स्कूटर्सच्या मायलेजचा विचार केला तर सध्याच्या पुणे-मुंबई सारख्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणी खरे म्हणजे मायलेज मिळणे हा नशिबाचा भाग ठरतो. स्टॅण्डर्ड चाचणीमध्ये असणारे मायलेज शहरांमध्ये कधी मिळत नाही. जास्तीत जास्त ४० ते ४५ िकलोमीटर इतके मायलेज प्रति लीटर पेट्रोलला मिळते. शहरातील रस्त्यांची स्थीत, वाहतुकीची स्थिती साधारण १० किलोमीटरपेक्षाही कमी अंतर जाण्यामुळे मिळणारे मायलेज हे खरे पाहिले तर जमेस धरण्यासारखे नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आज एकंदर शहरी स्कूटर्सचा वापर मायलेजपेक्षा कम्फर्ट यादृष्टीनेच केला जातो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सपाटीच्या रस्त्यावर ताशी ४५ ते ५० किलोमीटरच्या स्थिर वेगाने मोकळ्या रस्त्यावर व दीर्घ पल्ल्यामध्ये मायलेज नक्कीच चांगले मिळू शकते. मात्र शहरात ते अपेक्षित नक्कीच राहिलेले नाही, अशी स्थिती आहे.

टॅग्स :Auto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८Hondaहोंडाtwo wheelerटू व्हीलर