ओला इलेक्ट्रिक ऐन संक्रांत काळात कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्च भागेना, गाड्या खपेनात, परत डिस्काऊंटही दिला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 23:01 IST2026-01-30T23:00:25+5:302026-01-30T23:01:43+5:30

Bhavish Aggarwal Ola jobs cut ओला इलेक्ट्रिकमध्ये कर्मचारी कपातीचा दणका! ५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देऊन कंपनी खर्च कमी करणार.

Ola Electric Layoffs 2026: Ola Electric to cut workers during Sankranti; Expenses not covered, cars are being sold, discount given back... | ओला इलेक्ट्रिक ऐन संक्रांत काळात कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्च भागेना, गाड्या खपेनात, परत डिस्काऊंटही दिला... 

ओला इलेक्ट्रिक ऐन संक्रांत काळात कर्मचाऱ्यांना नारळ देणार; खर्च भागेना, गाड्या खपेनात, परत डिस्काऊंटही दिला... 

बेंगळुरू: भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत ५% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे ४५० ते ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. कंपनीला नफ्यात आणण्यासाठी आणि खर्चात कपात करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शेअर बाजारातील स्थिती पाहता, ओला इलेक्ट्रिक सध्या आपले बिझनेस मॉडेल अधिक कार्यक्षम करण्यावर भर देत आहे. कंपनीची विक्री कमालीची घसरलेली आहे. सर्व्हिस देत नसल्याने हजारो ग्राहकांच्या गाड्या नादुरुस्त आहेत. याचा फटका ओलाच्या विक्रीवर बसला असून अद्याप कंपनी निव्वळ नफ्यात आलेली नाही. त्यामुळे मनुष्यबळावर होणारा खर्च कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

उत्पादन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनचा वापर वाढल्याने काही विभागांतील कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे. मार्केटिंग, सेल्स आणि ऑपरेशन्स या विभागांतील कामगिरीचे पुनरावलोकन करून ही कपात केली जात आहे.

सर्व्हिसचे आव्हान
एकीकडे कर्मचारी कपात होत असताना, दुसरीकडे ओलाच्या गाड्यांच्या सर्व्हिसबाबत ग्राहकांमध्ये मोठी नाराजी आहे. अनेक शहरांमध्ये ओलाचे सर्व्हिस सेंटर्स गाड्यांनी भरलेली असून ग्राहकांना वेळेवर दुरुस्ती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्यामुळे सर्व्हिसवर काय परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ओलाची भविष्यातील वाटचाल
भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ओला आता केवळ स्कूटर्सपुरती मर्यादित न राहता इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्वतःच्या लिथियम-आयन सेल उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे. या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी कंपनीला आपला खर्च कमी करणे अनिवार्य झाले आहे.

Web Title : वित्तीय संकट के बीच ओला इलेक्ट्रिक कर्मचारियों की छंटनी करेगी

Web Summary : ओला इलेक्ट्रिक बिक्री में गिरावट, सर्विस समस्याओं और वित्तीय नुकसान के कारण 5% कर्मचारियों को निकाल रही है। कंपनी का लक्ष्य इलेक्ट्रिक बाइक और लिथियम-आयन सेल उत्पादन पर ध्यान केंद्रित करके संचालन को सुव्यवस्थित करना, लागत में कटौती करना और ग्राहक सेवा चुनौतियों के बीच दक्षता में सुधार करना है।

Web Title : Ola Electric to Lay Off Staff Amidst Financial Concerns

Web Summary : Ola Electric is laying off 5% of its workforce due to declining sales, service issues, and financial losses. The company aims to streamline operations, focusing on electric bikes and lithium-ion cell production to cut costs and improve efficiency amid customer service challenges.