शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Nissan India Price Hike: मारूती पाठोपाठ निसानच्या कारही महागणार, १ एप्रिलपासून होणार दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 6:59 PM

Maruti Suzuki India च्या निर्णयानंतर Nissan India नंदेखील कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देयापूर्वी मारूती सुझुकीनंही १ एप्रिलपासून दरवाढ करण्याचा घेतला होता निर्णयऑटो पार्ट्सच्या वाढत्या किंमतीमुळे निर्णय घेतल्याची निसानची माहिती

Nissan India Price Hike: आपलं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ग्राहकांना आपला खिसा थोडा जास्त रिकामा करावा लागणार आहे. एप्रिल महिन्यापासून कंपन्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. मारूती सुझुकी इंडियानंतर आता वाहन उत्पादक कंपनी निसान देखील आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान इंडियानं मंगळवारी अन्य उत्पादनांच्या किंमती वाढल्यामुळे कारच्या किंमती वाढवल्या जाणार असल्याची माहिती दिली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०२१ पासून Nissan आणि Datsun च्या सर्व गाड्यांच्या किंमती वाढवण्यात येणार आहेत. परंतु सध्या या किंमती किती वाढवल्या जातील याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही. ऑटो पार्ट्सच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीनं किंमती न वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु आता कंपनी सर्व Nissan आणि Datsun च्या गाड्यांच्या किंमती वाढवणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. तसंच प्रत्येक व्हेरिअंटप्रमाणे या किंमती निरनिराळ्या असतील असंही कंपनीनं स्पष्ट केलं. प्रत्येक व्हेरिअंटनुसार गाड्यांच्या किंमती वाढवल्या जात आहे. परंतु आताही भारतीय ग्राहकांना बेस्ट व्हॅल्यू प्रपोझिशन उपलब्ध करून दिलं जात आहे, अशी प्रतिक्रियाा निसान मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी दिली. मारूतीच्या गाड्याही महागणारएप्रिल महिन्यात Maruti Alto पासून Maruti Brezza पर्यंत अनेक कार्स महाग होणार आहेत. या वर्षात कंपनी दुसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार आहे. यापूर्वी कंपनीनं जानेवारी महिन्यात आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या होत्या. Maruti Suzuki नं दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ निरनिराळ्या कार्सच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे. परंतु कोणत्या कारची किंमत किती वाढेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाहन क्षेत्राला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसंच मागणी कमी आणि कारसाठी आवश्यक असलेल्या अन्य उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली होती.

टॅग्स :AutomobileवाहनNissanनिस्सानMaruti Suzukiमारुती सुझुकीcarकारIndiaभारत