Nissan Gravite देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर! खास आहेत फीचर्स; कुणा कुणाचं टेन्शन वाढवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:25 IST2026-02-20T18:15:27+5:302026-02-20T18:25:55+5:30
निसानने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन Nissan Gravite MPV लाँच केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट ७-सीटर ...

Nissan Gravite देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर! खास आहेत फीचर्स; कुणा कुणाचं टेन्शन वाढवणार?
निसानने भारतीय बाजारात आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने नवीन Nissan Gravite MPV लाँच केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट ७-सीटर गाडी आहे. खास कौटुंबिक वापरासाठी ही कार तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारमध्ये कमी किमतीत जबरदस्त आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय चांगला स्पेस आणि उत्तम सुरक्षा या कारमध्ये देण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५.६५ लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
ढासू प्रीमियम फीचर्स -
ही कार रेनॉल्ट ट्रायबर प्रमाणे असली तीर, या कारमध्ये अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 'इंटीग्रेटेड ड्युअल डॅशकॅम' देण्यात आला आहे, जो गाडी चालवताना रेकॉर्ड करतो. JBL चा प्रीमियम साउंड सिस्टम आणि इन-बिल्ट एअर प्युरिफायर यांसारख्या सुविधा आहेत. हे खास फीचर्स 'टेक्ना' (Tekna) ट्रिममध्ये उपलब्ध आहेत.
ही एक कॉम्पॅक्ट आकार असूनही हिच्याच चांगला स्पेस मिलतो. या MPV मध्ये १५० पेक्षा अधिक 'सीटिंग कॉन्फिगरेशन'चे पर्याय मिळतात. आवश्यकतेनुसार, सीट फोल्ड करून जागा वाढवता येते. ५-सीटर मोडमध्ये यात ६२५ लीटर एवढा मोठा बूट स्पेस मिळतो. याशिवाय, कारमध्ये लेदरिट सीट्स, ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि वुडन फिनिशमुळे प्रीमियम फील येतो. यात २०.३२ सेमी टचस्क्रीन आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत.
जबरदस्त सुरक्षा, किंमत किती? -
सुरक्षेचा विचार करता, या कारमध्ये सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, ट्रॅक्शन नियंत्रण, हिल स्टार्ट असिस्ट आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स देखील उपलब्ध आहेत. डॅशकॅम अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतो. या सर्व वैशिष्ट्यांमुळे ही कार कुटुंबांसाठी एक सुरक्षित पर्याय ठरू शकते.
५.६५ लाख रुपयांच्या किमतीत ही गाडी 'व्हॅल्यू फॉर मनी' मानली जात आहे. लवकरच कंपनी याचा ड्युअल सीएनजी पर्यायही आणणार आहे. ही कार मारुती अर्टिगा, XL6, Renault Triber आणि किया कारेन्स सारख्या कारना तगडी टक्कर देईल.