सर्वात स्वस्त 7-सीटर कारनं रचला इतिहास! केला मोठा कारनामा; जाणून घ्या फीचर अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 11:44 AM2023-02-23T11:44:38+5:302023-02-23T11:46:24+5:30

कंपनीने ही कार तेरा वर्षांपूर्वी बाजारात आणली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत, या कारने बाजारात जी पकड निर्माण केली आहे, त्याला तोड नाही.

Maruti suzuki eeco cheapest 7 seater car made history sales cross the 10 lakh unit Know the features and price | सर्वात स्वस्त 7-सीटर कारनं रचला इतिहास! केला मोठा कारनामा; जाणून घ्या फीचर अन् किंमत

सर्वात स्वस्त 7-सीटर कारनं रचला इतिहास! केला मोठा कारनामा; जाणून घ्या फीचर अन् किंमत

googlenewsNext

मारुती सुझुकीची प्रसिद्ध व्हॅन मारुती ईकोने आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी इकोने विक्रीच्या बाबतीत दहा लाख युनिट्सचा आकडा ओलांडला आहे. कंपनीने आज घोषणा केली की, ही कार 2010 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या कारचे 10 लाख युनिट्स विकले गेले आहेत. मारुती Eeco 5-सीटर आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनसह एकूण 13 व्हेरिअंटमध्ये येते. यात कार्गो, अॅम्ब्युलन्स आणि टूर व्हेरिअंटचा समावेश आहे.

महत्वाचे म्हणजे, कंपनीने मारुती सुझुकी ईको तेरा वर्षांपूर्वी बाजारात आणली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या कारने बाजारात जी पकड निर्माण केली आहे, त्याला तोड नाही. मारुती ईको ही तिच्या सेगमेंटमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. या कारचा व्यावसायिक वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. जर आकड्यावर नजर टाकली तर, मारुती Eeco चे तिच्या सेगमेंटमध्ये 94 टक्के मार्केट शेअर आहे. किफायतशीर फॅमिली कारपासून ते डिलिव्हरी व्हॅनपर्यंत, ही कार जवळजवळ प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत या कारचा  वापर केला जातो.

ही कार 2010 मध्ये लॉन्च करण्यात आली. तेव्हा पहिल्या 5 युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार करण्यासाठी जवळपास 8 वर्ष लागले. तसेच इतर 5 लाख युनिट्सचा आकडा कंपनीने केवळ पुढच्या 3 वर्षांतच पूर्ण केला.

कशी आहे Maruti Suzuki Eeco: 
मारुती सुझुकी इंडियाने स्थानिक बाजारात नुकतीच आपली प्रसिद्ध एमपीव्ही कार Maruti Eeco चे नवे अपडेटेड मॉडेल लॉन्च केले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.25 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. नव्या Maruti Eeco ला कंपनीने नवे रिफ्रेश इंटीरिअर आणि अॅडव्हान्स फीचर्स दिले आहेत. या कारला 1.2 लिटर क्षमतेचे K-Series डुअल-जेट व्हीव्हीटी पेट्रोल इंजिनचा देण्यात आले आहे. जे 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm चा टार्क जनरेट करते.

मिळतात असे फीचर्स - 
या शिवाय या कारमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, नवे स्टेअरिंग व्हील, AC साठी रोटरी कंट्रोल आणि हिटर देण्यात आले आहे. जे हिच्या केबिनला अपग्रेड करतात. हिच्या पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 60 लिटरचा बूट स्पेस मिळतो 

मायलेज जबरदस्त - 
या कारचे पेट्रोल व्हर्जन मागील मॉडेलच्या तुलनेत 25 टक्के अधिक मायलेज देईल. पेट्रोल मॉडेलवर ही कार 19.71 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देईल तर सीएनजी व्हर्जन 26.78 किलोमीटर प्रति किग्रॅ एवढे मायलेज देईल.

Web Title: Maruti suzuki eeco cheapest 7 seater car made history sales cross the 10 lakh unit Know the features and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.