इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 09:12 PM2023-09-11T21:12:17+5:302023-09-11T21:13:08+5:30

Mahindra Electric Cars: काही दिवसांपूर्वीच महिंद्राने इलेक्ट्रीक Thar चे मॉडेल लॉन्च केले होते. आता या गाड्यांचेही इलेक्ट्रीक मॉडेल येणार आहेत.

Mahindra Electric Cars: From New Thar to Bolero EV, Mahindra will launch 4 new electric cars | इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत...

इलेक्ट्रिक अवतारात येणार महिंद्राच्या 'या' 4 गाड्या, किती असेल किंमत...

googlenewsNext

Mahindra Electric Cars: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच कंपन्या आपल्या नवनवीन इलेक्ट्रीक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. हीच मागणी पाहून महिंद्रा अँड महिंद्रादेखील EV शर्यतीत सामील झाली आहे. महिंद्राकडे सध्या XUV 400 ही एकच इलेक्ट्रिक कार आहे. पण, लवकरच कंपनी भारतात आणखी चार नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी इलेक्ट्रिक थारचे कनसेप्ट मॉडेल लॉन्च केले होते. ही कार लवकरच देशात लॉन्च केली जाईल. याशिवाय बोलेरो, स्कॉर्पिओ आणि XUV.e8 देखील इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च होतील. 

महिंद्रा xuv.e8
महिंद्रा आपल्या XUV 700, xuv.e8 चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. या ईव्हीचे कनसेप्ट मॉडेल कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये यूकेतील ऑटो फेस्टमध्ये सादर केले होते. या कारमध्ये 80kWh ची बॅटरी आणि 230 ते 350bhp पॉवर देणारे इंजिन मिळू शकते. कंपनी ही कार डिसेंबरपर्यंत लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. याची किंमत 30 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

महिंद्रा Thar.e
महिंद्राने केपटाऊन येथील ग्लोबल फ्युचरस्केप इव्हेंटमध्ये Thar.e चे कनसेप्ट मॉडेल सादर केले होते. महिंद्राने या कारला 5 डोअर फ्युचरिस्टिक लुक दिला आहे. महिंद्रा मार्च 2026 पर्यंत ही कार लॉन्च करू शकते. या इलेक्ट्रिक थारची किंमत 20-25 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. 

Scorpio.e आणि Bolero.e
महिंद्राने स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात स्कॉर्पिओ आणि बोलेरोचे इलेक्ट्रिक व्हेरियंट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. Scorpio आणि Bolero.e 2026 पर्यंत भारतात लॉन्च होतील. आम्ही अपेक्षा करू शकतो की Thar.e प्रमाणे Scorpio.e आणि Bolero.e त्यांच्या सध्याच्या पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सपेक्षा भिन्न असतील.

Web Title: Mahindra Electric Cars: From New Thar to Bolero EV, Mahindra will launch 4 new electric cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.