या ₹७.८९ लाखांच्या SUV वर संपूर्ण देश 'फिदा'; ३ मिहन्यांत ८०००० बुकिंग; मिळतात ६ एअरबॅग्ज अन् बरंच काही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 21:15 IST2026-02-03T21:14:35+5:302026-02-03T21:15:02+5:30

या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी तब्बल ८०००० हून अधिक बुकिंग मिळाले. यांत पहिल्यांदाच खरेदी करणआरे ग्राहक अंदाजे ४८% आहेत...

hyundai venue ₹7 lakh 89 thausands SUV 80000 bookings in 3 months Gets 6 airbags and much more | या ₹७.८९ लाखांच्या SUV वर संपूर्ण देश 'फिदा'; ३ मिहन्यांत ८०००० बुकिंग; मिळतात ६ एअरबॅग्ज अन् बरंच काही!

या ₹७.८९ लाखांच्या SUV वर संपूर्ण देश 'फिदा'; ३ मिहन्यांत ८०००० बुकिंग; मिळतात ६ एअरबॅग्ज अन् बरंच काही!

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (HMIL) ने आर्थिक वर्ष २०२६ ची तिसरी तिमाही आणि नऊ महिन्यांचा आर्थिक कामगिरीचा अहवाल प्रसिद्ध केला. गत तिमाहीत, ह्युंदाईने तब्बल ₹१७९७३५ दशलक्ष एवढा महसूल नोंदवला होता, जो वर्षिक आधारावर ८% वाढला आहे. या तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) ₹२०१८३ दशलक्ष होते, जे ७.६% ने वाढले आहे. करपश्चात नफा ६.३% वाढून ₹१२,३४४ दशलक्षवर पोहोचला आहे.

सणासुदीच्या हंगाम आणि GST २.० किंमतीत कपात. यामुळे घाऊक विक्रीत सातत्याने सुधारणा झाली आणि डिसेंबर २०२५ मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत, ह्युंदाईने ₹६६,३२५ दशलक्ष EBITDA नोंदवला. जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३.३% ने वाढला आहे. यात क्रेटाने देशातील सर्वाधिक विक्री होणारी SUV म्हणून आपले स्थान पुन्हा प्राप्त केले. महत्वाचे म्हणजे, या मध्यम आकाराच्या एसयूव्हीने २०२५ च्या कॅलेंडर वर्षात २००००० वर्षिक विक्रीचा टप्पाही ओलांडला. 

दुसरीकडे, नवीन पिढीच्या व्हेन्यूला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ऑर्डर बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांतच, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी तब्बल ८०००० हून अधिक बुकिंग मिळाले. यांत पहिल्यांदाच खरेदी करणआरे ग्राहक अंदाजे ४८% आहेत. व्हेन्यूची एक्स-शोरूम किंमत ₹७.८९ लाख ते ₹१५.४८ लाखांपर्यंत जाते.

व्हेन्यूचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स - 
व्हेन्यूमध्ये थ्री-लेयर सेटअपसह खास डॅशबोर्ड लेआउट आहे. सेंट्रल एसी, कॉफी-टेबल सेंटर कन्सोलमध्ये अँबियंट लाइटिंग, गियर शिफ्ट लीव्हर, वायरलेस चार्जर, दोन कप होल्डर्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे. व्हेन्यूमध्ये स्टिअरिंग व्हील बिल्कुल नवे D-कट आहे. यावर चार डॉट्स आहेत, ते 'H' अक्षर दर्शवतात. याशिवाय, ड्युअल-टोन इंटिरिअर थीम (डार्क नेव्ही आणि डव्ह ग्रे), क्वाड बीम एलईडी हेडलॅम्प, ट्विन हॉर्न एलईडी डीआरएल, ब्रिज-टाइप रूफ रेल, नवीन १६-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स, याशिवाय सहा एअरबॅग्ज, लेव्हल २ एडीएएस, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आदी अनेक फीचर्स आहेत.

ह्युंदाई व्हेन्यू इंजिन पर्याय
इंजिनसंदर्भात बोलायचे झाल्यास, यात गत मॉडेलसारखेच पर्याय आहेत. पेट्रोल पर्यायांमध्ये ८३ एचपी जनरेट करण्याची क्षमता असलेले १.२-लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन, १२० एचपी जनरेट करणारे १.०-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. पहिले फक्त ५-स्पीड मॅन्युअलसह येते, तर दुसरे ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिकसह येते. व्हेन्यूमध्ये ११६ एचपी जनरेट करणारे १.५-लिटर डिझेल इंजिनही आहे. गियरबॉक्स पर्यायांमध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहे. 

Web Title : हुंडई वेन्यू एसयूवी ने भारत को लुभाया: 80,000 बुकिंग, सुविधाओं से भरपूर

Web Summary : हुंडई वेन्यू की नई पीढ़ी को तीन महीनों में 80,000 बुकिंग के साथ भारी मांग मिली है। इसमें छह एयरबैग, उन्नत सुविधाएँ और इंजन विकल्प हैं। वेन्यू की कीमत ₹7.89 लाख से शुरू होती है।

Web Title : Hyundai Venue SUV Captivates India: 80,000 Bookings, Packed with Features

Web Summary : Hyundai Venue's new generation sees huge demand with 80,000 bookings in three months. It boasts six airbags, advanced features, and engine options. The Venue is priced from ₹7.89 lakh.