आहे देशातील पहिली गिअरवाली इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 18:59 IST2026-01-11T18:58:11+5:302026-01-11T18:59:03+5:30
First Gearbox Electric Bike: सहसा इलेक्ट्रिक बाइक्स सिंगल-स्पीड ट्रान्समिशनसह येते, परंतु या बाइकमध्ये गिअरबॉक्स दिला आहे.

आहे देशातील पहिली गिअरवाली इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...
First Gearbox Electric Bike: भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आतापर्यंत स्कूटर्सचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. या बदलाच्या टप्प्यावर Matter कंपनीची Matter Era 5000 Plus ही इलेक्ट्रिक मोटरसायकल विशेष लक्ष वेधून घेत आहे. या बाईकची सर्वात मोठी खासियत म्हणजे, या बाइकमध्ये पेट्रोल बाइकप्रमाणे मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.
फ्यूचरिस्टिक डिझाइन, स्पोर्टी लूक
Matter Era 5000 Plus चे डिझाइन पूर्णपणे आधुनिक आणि फ्यूचरिस्टिक आहे. फ्रंटला प्रोजेक्टर LED हेडलॅम्प आणि LED DRLs देण्यात आले आहेत. अँगल्ड बॉडी पॅनल्समुळे बाईक स्थिर अवस्थेतही स्पोर्टी दिसते. साइड प्रोफाइलमध्ये फ्युएल टँकसारखा दिसणारा भाग प्रत्यक्षात बॅटरी कव्हर आहे. त्याखाली पावरट्रेन बसवण्यात आले आहे. स्प्लिट सीट, अलॉय व्हील्स आणि टेपरड टेल सेक्शन डिझाइनला आणखी आकर्षक बनवतात.
7-इंच TFT टचस्क्रीन : डिजिटल कंट्रोल सेंटर
या इलेक्ट्रिक बाइकमधील सर्वात मोठी हायलाइट म्हणजे, 7-इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले. या स्क्रीनवर राइडरला स्पीड, बॅटरी लेव्हल, ट्रिप डिटेल्स आणि राइडशी संबंधित इतर माहिती पाहता येते. स्क्रीनची पोजिशनिंग अशी आहे की, राइडिंगदरम्यान रस्त्यावरून लक्ष हटत नाही. याशिवाय या डिस्प्लेमध्ये राइडर प्रोफाइल, स्मार्टफोन नोटिफिकेशन्स, नेव्हिगेशन आणि सेटिंग्स मेन्यू...अशा अनेक स्मार्ट फीचर्सचा समावेश आहे. यूजर आपल्या गरजेनुसार स्क्रीन लेआउट कस्टमाइझ करू शकतो.
5 kWh बॅटरी आणि लिक्विड-कूलिंग सिस्टम
Matter Era 5000 Plus मध्ये 5 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी इन-बिल्ट लिक्विड-कूलिंग सिस्टमसह येते. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लिक्विड कूलिंग अजूनही दुर्मिळ मानली जाते, त्यामुळे हा तांत्रिकदृष्ट्या मोठा फायदा आहे. लिक्विड कूलिंगमुळे बॅटरी आणि मोटरचे तापमान नियंत्रित राहते. जास्त लोडमध्येही परफॉर्मन्स स्थिर राहतो.
4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स
या बाईकमध्ये 10.5 kW परमनंट मॅग्नेट मोटर देण्यात आली असून, ती 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. बहुतेक इलेक्ट्रिक बाईक्स सिंगल-स्पीड ट्रान्समिशनवर चालतात. मात्र, गिअरबॉक्समुळे राइडरला अधिक कंट्रोल मिळतो, इंजिन ब्रेकिंगसारखा अनुभव येतो आणि पेट्रोल बाइक चालवण्याचा फिल मिळतो.
राइडिंग मोड्स आणि परफॉर्मन्स
Matter Era 5000 Plus मध्ये तीन राइडिंग मोड्स Eco, City आणि Sport मिळतात. Sport मोडमध्ये बाईकची टॉप स्पीड सुमारे 105 किमी प्रतितास असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाईक 0 ते 60 किमी/ता वेग अवघ्या 6 सेकंदांत गाठते, त्यामुळे शहरासोबतच हायवे राइडिंगसाठीही ती सक्षम ठरते. बाईकमध्ये साइडला चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, छोटा स्टोरेज कंपार्टमेंटही उपलब्ध असून रोजच्या गरजेच्या वस्तू ठेवता येतात.
किंमत आणि सेगमेंटमधील स्थान
Matter Era 5000 Plus ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.84 लाख आहे. याच लाइन-अपमध्ये एक कमी फीचर्स असलेला वेरिएंटही उपलब्ध आहे, मात्र पावरट्रेन समान आहे. किंमतीच्या दृष्टीने ही बाईक प्रीमियम इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये मोडते.