शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:59 IST

Honda Activa Electric आणि QC1 भारतीय बाजारात येणार असे समजताच भल्या भल्या कंपन्यांची भंबेरी उडाली होती.

भारताच्या पेट्रोल स्कूटरच्या बाजारात धुमाकूळ घालणारी अॅक्टिव्हाचे इलेक्ट्रीक व्हर्जन अक्षरश: अपयशी ठरले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतू कंपनीने दोन्ही ईलेक्ट्रीक स्कूटरचे उत्पादन थांबविले आहे. जेवढ्या बनविल्या त्याच्या निम्म्या स्कूटरही विकल्या गेल्या नाहीत. मोठी नामुष्की होंडावर आली आहे. कंपनी ईव्ही बाजाराची गरज ओळखण्यात अपयशी ठरली आहे. 

Honda Activa Electric आणि QC1 भारतीय बाजारात येणार असे समजताच भल्या भल्या कंपन्यांची भंबेरी उडाली होती. परंतू, या स्कूटरची मागणी कमी होण्याची सर्वात महत्वाची बाब म्हणजे डिक्की ठरली आहे. ग्राहकांना छोटी पिशवी ठेवण्यासाठी देखील डिक्की देण्यात आली नव्हती. यामुळे जे लोक स्कूटर घेतात, त्यांची मूळ गरज ही डिक्की असते. महिलांची पर्स, पिशव्या, साहित्य, फाईल्स आदी गोष्टी या डिक्कीत ठेवल्या जातात. परंतू, होंडाने तीन न दिल्याने बहुतांशी ग्राहकांनी या स्कूटरकडे पाठ फिरविली आहे. याचा परिणाम असा झाला की होंडाची स्कूटरला गिऱ्हाईकच मिळाले नाही, यामुळे हजारो स्कूटर या होंड्याच्या कंपनीतच पडून राहिल्या आणि अखेरीस या स्कूटरचे उत्पादन बंद करण्याची वेळ कंपनीवर आली आहे. 

कंपनीने ऑगस्टपासून दोन्ही मॉडेलचे उत्पादन थांबविले आहे. होंडासारख्या मोठ्या आणि विश्वसनीय ब्रँडकडून इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा होती. विशेषतः, Activa या लोकप्रिय नावामुळे Activa e (एक्स-शोरूम किंमत ₹1.17 लाख) हिट होईल असे मानले जात होते. मात्र, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या दोन्ही स्कूटर्सच्या उत्पादनावर ब्रेक लागला आहे.

विक्रीची निराशाजनक आकडेवारीफेब्रुवारी ते जुलै २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत कंपनीने दोन्ही स्कूटर्सचे एकूण ११,१६८ युनिट्स तयार केले होत. परंतु, डीलर्सपर्यंत केवळ ५,२०१ युनिट्सच पोहोचू शकले. याचा अर्थ उत्पादित स्कूटर्सपैकी अर्ध्याहून अधिक युनिट्स अजूनही कंपनीकडे स्टॉक म्हणून पडून आहेत. बजाज, टीव्हीएस, एथर आणि ओलासारख्या कंपन्या याच सेगमेंटमध्ये दमदार फीचर्ससह आकर्षक उत्पादने देत आहेत. यामुळे होंडाच्या स्कूटर्सना ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

बॅटरी स्वॅपिंगची मर्यादाActiva e मध्ये बॅटरी स्वॅपिंगचे तंत्रज्ञान असले तरी, त्यासाठी मजबूत आणि व्यापक 'स्वॅपिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर' आवश्यक आहे. सध्या होंडा एकटीच ही सुविधा देत असल्याने, मर्यादित स्वॅपिंग स्टेशनमुळे ही योजना फोल ठरली आहे. Activa e फक्त मुंबई, बंगळूर आणि दिल्ली या तीन शहरांमध्येच उपलब्ध होती, तर QC1 (एक्स-शोरूम किंमत ₹90,000) सहा शहरांमध्ये (मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, पुणे आणि चंदीगड) उपलब्ध होती. मर्यादित शहरांमध्ये उपलब्धता असल्यामुळेही विक्रीवर परिणाम झाला.

विक्रीतील ही मंदी पाहता, होंडा कंपनीने सध्यासाठी या दोन इलेक्ट्रिक मॉडेल्सचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कंपनीला इन्व्हेंटरीचा भार कमी करता येईल आणि भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या धोरणावर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Honda's Activa EV Fails: Production Halted Due to Poor Sales

Web Summary : Honda stopped Activa EV production due to dismal sales. Limited features, especially the missing storage, deterred buyers. Despite battery swapping, sales remained low, leading to a strategic production halt and future reassessment.
टॅग्स :Hondaहोंडा