टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 12:44 PM2023-01-17T12:44:06+5:302023-01-17T12:46:53+5:30

Electric Car : पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

Citroen ec3 electric car range price features tata tiago ev mahindra xuv400 | टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!  

टाटा-महिंद्रासारख्या कंपन्यांसमोर मोठे आव्हान; 'ही' स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लाँच होणार!  

googlenewsNext

नवी दिल्ली : फ्रान्स कार निर्माता कंपनी सिट्रोनने (Citroën) आपल्या C3 हॅचबॅकचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. या इलेक्ट्रिक व्हर्जनला eC3 असे नाव देण्यात आले आहे. ऑल-इलेक्ट्रिक C3 भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये लाँच होणार आहे. पुढील महिन्यात लाँच झाल्यानंतर Citroen eC3 ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटा, महिंद्रासारख्या भारतीय कंपन्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

Citroen eC3 डिझाईनच्या बाबतीत, eC3 ही भारतातील बाजारात उपलब्ध असलेल्या कंपनीच्या ICE म्हणजेच पेट्रोल मॉडेल C3 सारखी आहे. यामध्ये सिट्रोन लोगो आणि सेमी-क्रॉसओव्हर डिझाइन असणाऱ्या स्लीक ग्रिलसह एक प्रकारच्या डिझाइनला राखून ठेवते. हे अगदी क्रॉसओवरसारखे दिसते, परंतु कंपनी त्याला हॅचबॅक म्हणत आहे.

रेंज, चार्जिंग आणि बॅटरी
भारतात लवकरच लाँच होणार्‍या Citroen eC3 मध्ये 29.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो पूर्ण चार्ज केल्यावर 320 किमीची रेंज देतो. बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटर 56 bhp आणि 143 Nm टॉर्क निर्माण करते, ज्याचा टॉप स्पीड 107 kmph आहे. बॅटरी पॅक डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे 57 मिनिटांत बॅटरी पॅक 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते, तर सामान्य चार्जरद्वारे 10 ते 100 टक्के चार्जिंगला 10 तास 30 मिनिटे लागतात.

फीचर्स आणि सेफ्टी
आगामी इलेक्ट्रिक कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यामध्ये आपल्या आयसीई मॉडेल सारखे मॅन्युअल एसी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम यासारखे अनेक फीचर्स मिळतील. तसेच, Citroen eC3 लाईव्ह आणि फील या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

याशिवाय, कारमध्ये वायरलेस Apple CarPlay/Android Auto सह 10.2-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, चार-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट मिळेल. कारमध्ये कनेक्टेड कार टेक देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये चार्जिंग स्टेटस, लोकेशन आणि इतर अनेक फीचर्सला ऍक्सेस करता येतात. सेफ्टी फीचर्समध्ये ईबीडीसह एबीएस आणि ड्युअल एअरबॅगचा समावेश आहे.

Web Title: Citroen ec3 electric car range price features tata tiago ev mahindra xuv400

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.