शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीत कारच्या विक्रीत जबरदस्त वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 04:52 IST

कोरोनानंतर काही कंपन्यांची उच्चांकी कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पुरवठा साखळीमध्ये अजूनही समस्या असल्या तरी फेब्रुवारीमध्ये देशातील कार विक्रीत जबरदस्त वाढ झाली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टोयोटा आणि टाटा मोटर्स या कंपन्यांना कारविक्रीचा मोठा लाभ झाला आहे. निस्सानसारख्या कंपनीची विक्री तर ऐतिहासिक उच्चांकावर गेली आहे.

सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे वाहन उत्पादनासाठी आवश्यक असलेली पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली होती. ती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. विशेषत: सेमिकंडक्टरचा पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. असे असतानाही कार विक्रीमध्ये फेब्रुवारीत जबरदस्त वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मारुतीच्या प्रवासी वाहनांची विक्री ८ टक्क्यांनी वाढून १.४ लाख गाड्यांवर गेली. २९ टक्के वाढीसह ह्युंदाईची ५१,६०० प्रवासी वाहने विकली गेली. टाटा मोटार्सच्या विक्रीत तब्बल ११९ टक्के वाढ झाली. कंपनीची २७,२२५ वाहने विकली गेली. महिंद्राने ४१ टक्के वाढीसह १५,३९१ वाहने विकली. निस्सानचे एम.डी. राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, आमच्या ‘मॅग्नाइट’ला जबरदस्त बुकिंग मिळत आहे. त्यामुळे आम्ही उत्पादन वाढवीत आहोत. 

दुचाकींमध्ये हीरोची विक्री वाढलीदेशातील सर्वांत मोठी दुचाकी उत्पादक हीरो मोटोकॉर्पच्या विक्रीत १.४५ टक्का वाढ झाली आहे. कंपनीने फेब्रुवारीत ५,०५,४६७ गाड्या विकल्या. मागच्या वर्षी हा आकडा ४,७९,३१० होता. सुझुकी मोटारसायकल इंडियाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२१ मध्ये कंपनीच्या ५९,५३० गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षी हा आकडा ५८,६४४ होता.

टॅग्स :carकारAutomobileवाहन