शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

इलेक्ट्रीक कार आणि बाईक खरेदी करणं होणार सोपं; सरकार आणतंय नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:36 PM

इलेक्ट्रिक वाहनं खरेदीसाठी खिशावरील ताण कमी होण्याची शक्यता. इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा सरकारचा मानस.

ठळक मुद्देइलेक्ट्रिक वाहनं खरेदीसाठी खिशावरील ताण कमी होण्याची शक्यता.इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा सरकारचा मानस.

देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. आता इलेक्ट्रिक वाहनांवर लोकांचा प्रवेश सुलभ करण्यासाठी सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने एक प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. नोंदणी प्रमाणपत्र (RC) जारी करण्यासाठी किंवा नूतनीकरणासाठी फी भरण्यापासून बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना सूट देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.सरळ शब्दांत सांगायचं झालं तर इलेक्ट्रीक वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्यासाठी लागणारं नोंदणी शुल्क किंवा नुतनीकरणासाठी लागणारं शुल्क माफ केलं जाऊ शकतं. सध्या केंद्री मोटर वाहन कायदा १९८९ च्या नियम ८१ मध्ये एक वाक्य जोडण्याशिवाय या मसुद्याच्या अधिसूचनेत कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. या विषयामध्ये आणखी पैलू अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.अधिसूचनेत असे म्हटले आहे की "नियम २ (यू) मध्ये परिभाषित केल्यानुसार बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना त्यांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र जारी करणं किंवा नव्या रजिस्ट्रेशन मार्कला असाइनमेंटसाठी शुल्क भरण्यातून सूट देण्यात येईल." मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना सूट देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास चालना मिळणार आहे, असं मंत्रालयाचं मानणं आहे. काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ दिसून येऊ शकेल. विशेष करून दुचाकी वाहनांच्या सेगमेंटमध्ये लोकांना विशेष रस आहे. सध्या कार्समध्येही अनेक इलेक्ट्रिक कार्सचे ऑप्शन्स येताना दिसत आहेत. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनGovernmentसरकारIndiaभारतMONEYपैसा