शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

Best Mileage Bikes: एक लीटरमध्ये ७० किलोमीटरपर्यंत मायलेज; महागाईतही परवडतील 'या' ४ बाईक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:19 IST

वाढत्या महागाईच्या काळात आणि पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे सध्या सर्वसामान्यांचा कल 'जास्त मायलेज' देणाऱ्या गाड्यांकडे वाढला आहे.

वाढत्या महागाईच्या काळात आणि पेट्रोलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे सध्या सर्वसामान्यांचा कल 'जास्त मायलेज' देणाऱ्या गाड्यांकडे वाढला आहे. जर तुम्हीही दैनंदिन वापरासाठी एक स्वस्त, मस्त आणि विश्वासार्ह बाईक शोधत असाल, तर भारतीय बाजारपेठेत हिरो, होंडा, बजाज आणि टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांचे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

टीव्हीएस स्पोर्ट

टीव्हीएस स्पोर्ट ही कमी किमतीत उपलब्ध असलेली एक लोकप्रिय बाईक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹५५,५०० इतकी आहे. या बाईकमध्ये १०९.७ सीसी इंजिन आहे, जे दैनंदिन वापरासाठी फायदेशीर ठरते. मायलेजच्या बाबतीत, ही बाईक प्रति लिटर सरासरी ७० किलोमीटर देते. यामुळे बजेटमध्ये जास्त मायलेज मिळवू इच्छिणाऱ्यांमध्ये ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे.

बजाज प्लॅटिना ११०

भारतीय बाजारपेठेत बजाज प्लॅटिना ११० त्याच्या उत्कृष्ट मायलेज आणि आरामदायी राइडसाठी ओळखली जाते. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ६९ हजार ८३२ आहे. या बाईकमध्ये ११५.४५ सीसी इंजिन देण्यात आले. कंपनीच्या मते, ही बाईक ७० किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देऊ शकते.

होंडा शाइन १००

कमी किंमत आणि विश्वासार्ह इंजिनमुळे होंडा शाइन १०० अधिक लोकप्रिय झाले आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ६५ हजार २४३ आहे. ही बाईक ९८ सीसी इंजिनवर चालते. मायलेजच्या बाबतीत, ही बाईक सरासरी ५५ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देऊ शकते.

हिरो एचएफ डिलक्स

हिरो एचएफ डिलक्स ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. तिची परवडणारी किंमत, विश्वासार्ह इंजिन आणि चांगले मायलेज यामुळे ती ग्राहकांमध्ये लोकप्रिय निवड बनते. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ५७ हजार ६५७ आहे. ही बाईक सुमारे ७० किमी प्रति लिटर मायलेज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Best Mileage Bikes: Affordable options delivering up to 70 kmpl.

Web Summary : Amid rising fuel prices, consumers seek high-mileage bikes. TVS Sport, Bajaj Platina 110, Honda Shine 100, and Hero HF Deluxe offer excellent mileage and affordability, with some models claiming up to 70 kmpl, making them ideal for budget-conscious buyers.
टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन