Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 10:47 AM2020-01-21T10:47:53+5:302020-01-21T10:50:34+5:30

यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Auto Expo 2020: Most eye-catching Auto Expo; About 70 cars will be launched | Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

Next
ठळक मुद्देकारण बीएस ६ नियमावलीमुळे सर्वच कंपन्यांना नव्या कार लाँच कराव्य़ा लागणार आहेत.यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या ऑटो एक्स्पोचा खर्च परवडत नसल्याचे सांगत सहभागी न झालेल्या कंपन्याही यंदा दिसणार आहेत. 

नवी दिल्ली : यंदाचा ऑटो एक्स्पो भारतीय वाहन बाजारासाठी खूप महत्वाचा आणि सर्वाधिक लक्षवेधी असणार आहे. कारण बीएस ६ नियमावलीमुळे सर्वच कंपन्यांना नव्या कार लाँच कराव्य़ा लागणार आहेत. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या ऑटो एक्स्पोचा खर्च परवडत नसल्याचे सांगत सहभागी न झालेल्या कंपन्याही यंदा दिसणार आहेत. 


यंदाचा Auto Expo 2020 ग्रेटर नोएडामध्ये 7 ते 12 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 15 टक्के कंपन्या कमी झाल्या आहेत. मात्र, गेले वर्षभर मंदी सहन करूनही ऑटो कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कंपन्यांनीही कसून तयारी केली असून उद्या ह्युंदाई नवीन कार ऑरा लाँच करणार आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी टाटा मोटर्स एकाचवेळी चार कार लाँच करणार आहे. यामध्ये सध्या चर्चेत असलेली अल्ट्रोझही असणार आहे. 


Auto Expo 2020 अशावेळी होत आहे जेव्हा ऑटो सेक्टर गेल्या तीन दशकांतील सर्वात वाईट काळातून जाता आहे. या एक्स्पोमध्ये हीरो मोटोकॉर्प, बीएमडब्लू, टीव्हीएस, एचएमएसआय, ऑडी, होंडा, टोयोटा, निस्सान, अशोक लेलँड या कंपन्या भाग घेणार नाहीत. तर फोक्सवॅगन, फोर्ड या कंपन्या भाग घेणार आहेत. 


यापैकी काही कंपन्यांनी सांगितले की, एप्रिल 2020 पासून लागू होणाऱ्या बीएस6 वाहनांच्या लाँचिंगमध्ये व्यस्त आहेत. यामुळे एक्स्पोमध्ये सहभागी होता येणार नाही. तर ज्या कंपन्या सहभागी होत आहेत त्यांनी सांगितले की, भारतासारखी बाजारपेठ कधी हलक्यात घेऊ नये. 

टाटा मोटर्स पहिल्यांदा चार कार लाँच करणार आहे. यानंतर ह्युंदाईदेखील भविष्यातील इलेक्ट्रीक वाहने एक्स्पोमध्ये दाखविणार आहे. मारुती सुझुकीही त्यांच्या ताफ्यात असलेल्या कार नव्या रुपात लाँच करणार आहे. यामध्ये सियाझ, ब्रिझा, इग्निस, बलेनो असण्याची शक्यता आहे. याशिवाय एक कन्सेप्ट कारही दाखविणार आहे. 

Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय

भारतात येतेय जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; 100 च्या स्पीडने पळणार

बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार


याच दरम्यान, किया मोटर्स नवी परंतू फार कमी काळात भारतात पाय रोवणारी कंपनी दोन नवीन कार लाँच करणार आहे. यामध्ये किया कार्निव्हल ही इनोव्हाला टक्कर देणारी लक्झरी एमपीव्ही असणार आहे. तर आणखी एक छोटी एसयुव्ही लाँच करणार आहे. याशिवाय यंदाच्या एक्स्पोमध्ये काही चीनच्या कंपन्याही लक्ष वेधून घेणार आहेत. 

Web Title: Auto Expo 2020: Most eye-catching Auto Expo; About 70 cars will be launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.