Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 07:56 PM2020-01-06T19:56:54+5:302020-01-07T10:03:54+5:30

भारतीय बाजारात नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कार किया सेल्टॉसमध्ये दोन त्रुटी आढळल्या आहेत.

Two serious problems in Kia Seltos; The company recalled the car | Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय

Kia Seltos मध्ये आढळल्या दोन समस्या; कंपनीने दिला सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय

googlenewsNext

भारतीय बाजारात नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कार किया सेल्टॉसमध्ये मोठी समस्या आली आहे. यामुळे कंपनीने या कारमधील सॉफ्टवेअर अपडेट करण्यास सांगितले आहे. ही कार गेल्या वर्षीच लाँच झाली होती आणि मागणीही मोठी होती. 


Kia Seltos च्या 7-speed DCT transmission म्हणजेच अॅटोमॅटीक मॉडेलला ही समस्या आली आहे. यामुळे कंपनीने मालकांना ही कार सर्व्हिस सेंटरला नेण्यास सांगितले आहे. सेल्टॉसच्या 1.4 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशन मॉडेलच्या कारमध्ये कंपनी सॉफ्टवेअर अपडेट करणार आहे. यासाठी कंपनी कोणतेही शुल्क आकारणार नाही. 
ग्राहकांना या कारमध्ये दोन समस्या जाणवत आहेत. बंगळुरूच्या ग्राहकाने सांगितले की वाहतूक कोंडीमध्ये कारच्या ट्रान्समिशनमध्ये ओव्हरहीट होत आहे. 

 


दुसरी समस्या म्हणजे कारचा ट्रान्समिशन गिअर स्किप होत आहे. कारच्या मालकांनी या समस्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मांडल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की गिअर केवळ 2, 4 आणि 6 एवढेच पडत आहेत. तर 1, 3 आणि 5 गिअर गाळले जात आहेत. 


ही समस्या सोडविण्यासाठी कंपनीने सेल्टॉसच्या मालकांना संदेश पाठविले आहेत. या मॉडेलच्या कार सर्व्हिस सेंटरमध्ये आणण्यास सांगितले आहे. हे सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी 30 मिनिटांची वेळ लागणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 


कियाची ही डीसीटी ट्रान्समिशनची समस्या एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. कोरियामध्ये पहिल्यांदा ही समस्या लक्षात आली होती. कोरियातही हाच उपाय करण्यात आला होता.

Web Title: Two serious problems in Kia Seltos; The company recalled the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.