फक्त ₹५१००० मध्ये सुरू झाली 'या' कारची प्री-बुकिंग, ७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ; टोयोटा-स्कॉर्पिओला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 22:13 IST2026-02-04T22:12:17+5:302026-02-04T22:13:29+5:30

ही कार, टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर, जीप मेरिडियन आणि आगामी एमजी मॅजेस्टी सारख्या प्रीमियम ७-सीटर एसयूव्हीना टक्कर देईल... किती असेल किंमत?

7seater volkswagen tayron Pre-booking has started at just rs 51000, it will create a stir in the 7-seater segment it will compete with Toyota-Scorpio | फक्त ₹५१००० मध्ये सुरू झाली 'या' कारची प्री-बुकिंग, ७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ; टोयोटा-स्कॉर्पिओला देणार टक्कर

फक्त ₹५१००० मध्ये सुरू झाली 'या' कारची प्री-बुकिंग, ७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ; टोयोटा-स्कॉर्पिओला देणार टक्कर


७-सीटर सेगमेंटमध्ये घालणार धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असलेल्या फॉक्सवॅगन इंडियाने २०२६ सालाची सुरुवात अगदी धडाक्यात केली आहे. कंपनीने आपली बहुप्रतिक्षित आणि प्रीमियम ७-सीटर एसयूव्ही 'फॉक्सवॅगन टेरॉन R-लाइन' (Volkswagen Tayron R-Line) ची प्री-बुकिंग भारतात अधिकृतपणे सुरू केली आहे. ग्राहक ५१,००० रुपयांच्या टोकनवर ही कार देशभरातील कुठळ्याही डीलरशिप अथवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बुक करू शकतात. कारचा अधिकृत लॉन्च सोहळा फेब्रुवारी महिन्यात पार पडेल.

किती असेल किंमत ? -
महत्वाचे म्हणजे, फोक्सवॅगन टायरॉनचे उत्पादन स्थानिक असेंबलीद्वारे (CKD) भारतात केले जात आहे. यामुळे हिची किंमतही लक्षणीयरीत्या नियंत्रणात राहील. हिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ४५ लाख रुपयांच्या जवळपास असू शकते.

यांना देणार टक्कर -  
टेरॉन टोयोटा फॉर्च्युनर, स्कोडा कोडियाक, एमजी ग्लोस्टर, जीप मेरिडियन आणि आगामी एमजी मॅजेस्टी सारख्या प्रीमियम ७-सीटर एसयूव्हीना टक्कर देईल.

असे असतील सेफ्टी फीचर्स -
सुरक्षेचा विचार करता ही कार अत्यंत आधुनिक असेल. कारमध्ये ९ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असेंट आणि डिसेंट कंट्रोलसह 'लेव्हल २ ADAS' (१४ प्रगत ड्रायव्हर असिस्ट फीचर्स) देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये मल्टिपल ड्रायव्हर प्रोफाइल मोड्सही मिळतील.
 
असे असतील कलर ऑप्शन -
रंगाचा विचार करता, ही एसयूव्ही डॉल्फिन ग्रे मेटॅलिक, ऑरेक्स व्हाईट मदर ऑफ पर्ल इफेक्ट आणि नाईटशेड ब्लू मेटॅलिक यांसारख्या प्रीमियम शेड्समद्ये उपलब्ध असेल.

दमदार इंजिन - 
या प्रीमियम SUV मध्ये फोक्सवॅगनचे शक्तिशाली पेट्रोल इंजिन असेल. जे २.०-लिटर TSI EA888 evo4 टर्बो पेट्रोल इंजिन असून २०४ पीएस पॉवर आणि ३२० Nm टॉर्क जनरेट करेल. जे ७-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ४MOTION AWD ड्राइव्ह सिस्टम (मानक) सह जोडलेले आहे. महत्वाचे म्हणजे Tayron केवळ ७.३ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग धारण करू शकते. हिचा टॉप स्पीड २२४ किमी प्रतितास आहे.


 

Web Title : फॉक्सवैगन टेरॉन आर-लाइन की प्री-बुकिंग शुरू: टोयोटा को टक्कर देने वाली 7-सीटर एसयूवी

Web Summary : फॉक्सवैगन इंडिया ने अपनी टेरॉन आर-लाइन 7-सीटर एसयूवी की प्री-बुकिंग शुरू कर दी है। 51,000 रुपये में बुकिंग शुरू है। कार में 9 एयरबैग और लेवल 2 ADAS जैसी उन्नत सुरक्षा सुविधाएँ हैं। इसमें 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजन है, जो टोयोटा फॉर्च्यूनर और स्कॉर्पियो को टक्कर देगा।

Web Title : Volkswagen Tayron R-Line Pre-Booking Starts: A 7-Seater SUV Rivaling Toyota

Web Summary : Volkswagen India has commenced pre-bookings for its Tayron R-Line 7-seater SUV. Bookings are open for ₹51,000. The car boasts advanced safety features like 9 airbags and Level 2 ADAS. It houses a 2.0-liter turbo petrol engine, challenging Toyota Fortuner and Scorpio.