दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत कोण ? पोलिसांचे महापालिकेला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 07:07 PM2020-01-24T19:07:31+5:302020-01-24T19:16:06+5:30

पोलिसांनी तपासाला वेग देत याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले.

Who Causes the Death of a moped rider women ? Letter of Police to the Municipal Corporation of Aurangabad | दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत कोण ? पोलिसांचे महापालिकेला पत्र

दुचाकीस्वार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत कोण ? पोलिसांचे महापालिकेला पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी बसचालकाची जामिनावर सुटकामुकुंदवाडी पोलिसांकडून तपास 

औरंगाबाद : पथदिव्यांच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून जालना रोडवर पडल्याने बसखाली चिरडून ललिता शंकर ढगे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी बसचालकांवर अटकेची कारवाई केल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी आता तुटलेल्या केबलकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याची तयारी सुरू केली. पोलिसांनी तपासाला वेग देत याविषयी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले.

 मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, जालना रोडवरील रामनगर येथे भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला पथदिव्याच्या तुटलेल्या केबलमध्ये अडकून पडताच मागून सुसाट आलेल्या बसखाली चिरडून ठार झाली होती. या भीषण दुर्घटनेनंतर त्याच दिवशी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळावरून बससह पसार झालेला बसचालक भारत वसंतराव निनगुरकरला पोलिसांनी २१ जानेवारी रोजी अटक केली. रस्त्यावर पडलेल्या पथदिव्यांच्या तुटलेल्या के बल वायरमध्ये अडकल्याने दुचाकीसह ललिता पडल्या होत्या. अनेक दिवसांपासून रस्त्यावर तुटलेली केबल वायर लोंबकळत होती. याकडे महापालिकेच्या विद्युत विभाग आणि संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले.

भूमिगत केबलचा दोष शोधून काढून पथदिव्यांना वीजपुरवठा करण्याऐवजी संबंधित कंत्राटदाराने थेट डी.पी.मधून वीज जोडणी घेतलेल्या वायर ओव्हरहेड पद्धतीने पथदिव्यांपर्यंत नेले होते. जालना रोडवरील विविध पथदिव्यांवर हे के बल वायर लोंबकळत होते. मात्र रात्रीतून ती केबल गायब करण्यात आली. मात्र पोलिसांनी  घटनास्थळी पडलेल्या त्या केबल वायरची छायाचित्रे काढली होती. रस्त्यावर केबल लोंबकळण्यास जबाबदार कोण, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने मुकुंदवाडी पोलिसांनी बुधवारी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून माहिती मागितली आहे. 

बसचालकाची जामिनावर सुटका
आरोपी बसचालक भारत निनगुरकरला पोलिसांनी जामिनावर सोडल्याचे समोर आले. महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानंतर तात्काळ पोलिसांसमोर हजर होण्याऐवजी भारत घटनास्थळावरून पसार झाला होता.

मनपावर गुन्हा दाखल करा
ललिता ढगे यांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या मनपाच्या ढिसाळ कारभाराविषयी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत कासलीवाल पूर्व येथील रहिवासी, तसेच युवा मंडळाने जालना रोडवरील त्या अपघातस्थळाजवळ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. ढगे यांच्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी अशी लक्षवेधी निदर्शने केली. 

पोलीस परवानगीशिवाय उचलले केबल
आपल्या केबल वायरमुळे दुचाकीस्वार महिलेचा बळी गेल्याचे कळताच रात्रीतून गुपचूप केबल उचलून नेण्यात आली. विशेष म्हणजे मुकुंदवाडी पोलिसांना घटनास्थळी पंचनामा करून ती केबल जप्त करायची होती. मात्र तत्पूर्वीच कातडी बचाव अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही केबल उचलण्यात आल्याचे दिसून येते.

मनपाकडून माहिती येताच संबंधितांवर कारवाई
महापालिक ा आयुक्तांना पत्र पाठवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या केबलची जबाबदारी कोणाची आहे, याविषयी माहिती मागितली आहे. ही माहिती मिळताच, याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल.
-उद्धव जाधव, पोलीस निरीक्षक, मुकुंदवाडी ठाणे

Web Title: Who Causes the Death of a moped rider women ? Letter of Police to the Municipal Corporation of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.