औरंगाबादमध्ये ओव्हरटेक करायला रस्ता न दिल्याने एसटी चालकाला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 08:43 AM2020-02-19T08:43:34+5:302020-02-19T09:05:09+5:30

बस चालकाला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली.

ST driver was brutally beaten for failing to overtake in aurangabad | औरंगाबादमध्ये ओव्हरटेक करायला रस्ता न दिल्याने एसटी चालकाला बेदम मारहाण

औरंगाबादमध्ये ओव्हरटेक करायला रस्ता न दिल्याने एसटी चालकाला बेदम मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देकन्नड - औरंगाबाद - शिरपूर बसच्या चालकास शहरात दहा ते पंधरा जणांनी मिळून बेदम मारहाण केली.बस चालकाला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबर दुखापत केली. बसच्या समोरील काचा फोडत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले.

औरंगाबाद - कन्नड - औरंगाबाद - शिरपूर बसच्या चालकास शहरात दहा ते पंधरा जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (18 फेब्रुवारी) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कन्नड शहरात ही घटना घडली आहे. ओव्हरटेक करायला रस्ता न दिल्याने एसटी चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शिरपूर आगाराचे बस चालक सुधाकर शामराव शिरसाट आपल्या ताब्यातील बस (क्रमांक एमएच 20 बीएल 2672) कन्नडहून चाळीसगावकडे जात असताना अष्टविनायक हॉटेल समोर आरोपी अलीम मकबूल शहा रा. आयेशानगर, रिजवान सलीम शेख रा. महेताब नगर व इतर दहा ते पंधरा जणांनी बसला अडवून अडथळा निर्माण केला. बस चालकाला काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जबर दुखापत केली. चालकाच्या शर्टच्या खिशातील मोबाईल व बस वाहकाची हातातील 6 हजार 165 रुपये हिसकावून  घेतले तसेच एसटी बसच्या समोरील काचा फोडत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणीशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य हे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

५० हून अधिक भीषण स्फोटांनी हादरली डोंबिवली

७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी

भूखंडाचे श्रीखंड : सरकारी जमीन लाटली, आम्ही नाही पाहिली

एचएसबीसी बँकेतील ३५ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार!

 

Web Title: ST driver was brutally beaten for failing to overtake in aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.