औरंगाबादेत कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खाजगी बसला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 03:01 AM2021-09-19T03:01:19+5:302021-09-19T03:16:07+5:30

मिळालेल्या माहितीनुसार बसचालक कुरेशी हे शनिवारी रात्री 1 वाजता शेंद्रा एमआयडीसी तील पर्किन्स कंपनीच्या दुसऱ्या पाळीच्या कामगारांना घेऊन शहरात आले. बस सिडको एन 2 मधील महालक्ष्मी चौकातून जयभावणींनागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येताच बसच्या इंजिनामधून धूर निघू लागला.

private bus carrying workers caught fire In Aurangabad | औरंगाबादेत कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खाजगी बसला आग

औरंगाबादेत कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खाजगी बसला आग

googlenewsNext

बापू सोळुंके -

औरंगाबाद 
: शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पार्किन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या धावत्या खाजगी बसला शनिवारी रात्री 1:20 वाजता  आग लागली. ही घटना सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते जयभावनिनागर रस्त्यावर झाली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवून कामगारांना बसमधून उत्तरावल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत अवघ्या काही मिनिटात आगीने बस कवेत घेतली. आगीच्या माहितीनंतर फायरब्रिगेडच्या जवानानी घटनास्थळी येऊन आग विझवली मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून कोळसा झाली आणि बसचा सांगडाच राहिला. (private bus carrying workers caught fire In Aurangabad)




मिळालेल्या माहितीनुसार बसचालक कुरेशी हे शनिवारी रात्री 1 वाजता शेंद्रा एमआयडीसी तील पर्किन्स कंपनीच्या दुसऱ्या पाळीच्या कामगारांना घेऊन शहरात आले. बस सिडको एन 2 मधील महालक्ष्मी चौकातून जयभावणींनागरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येताच बसच्या इंजिनामधून धूर निघू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने बस उभी केली आणि कामगारांना बसमधून उतरवले आणि स्वतःही बाहेर पडला.  यानंतर त्यांनी माती टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर काहींनी फायरब्रिगेडला कॉल केला . तेव्हा चिकलठाणा एमआयडीसीमधून एक बंब तेथे दाखल झाला तोपर्यंत आगिने  संपूर्ण बसला वेढा दिला होता. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर आणि कर्मचारी यांनी शेजारील रुग्णालयातून पाणी मिळवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

 

Web Title: private bus carrying workers caught fire In Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.