The burden on the health system of visitors from outside the district | जिल्ह्याबाहेरील पाहुण्यांचा यंत्रणेवर भार

जिल्ह्याबाहेरील पाहुण्यांचा यंत्रणेवर भार

औरंगाबाद : आजूबाजूच्या जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले रूग्ण थेट औरंगाबादमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील सुमारे १८ टक्के रूग्णांचा औरंगाबादच्या यंत्रणेवर भार पडला आहे.

आयसीयु बेड्स, ऑक्सिजनची व्यवस्था, व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होण्याचे प्रमाण अन्य जिल्ह्यात कमी असल्याने औरंगाबादला उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. दर महिन्याला ७०० ते ८०० रूग्ण  उपचारासाठी येत आहेत.  औरंगाबादमध्ये आजवर ३६ हजारांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद झाली असून त्यातील १८ ते २० टक्के रूग्ण अहमदनगर, जळगाव, धुळे या ठिकाणांहून उपचारासाठी आले होते.

प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागात सध्या सर्व मिळून १ लाख १२ हजार २२४ पैकी ९१ हजार ७४० रूग्ण बरे झाले आहेत. ३ हजार १४६ मृत्यू झाले असून १६ हजार ३३८ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. 

 

Web Title: The burden on the health system of visitors from outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.