6 lakh assistance to 6 drought-stricken students | दुष्काळग्रस्त ३०० विद्यार्थ्यांना मंदा म्हात्रेंकडून सहा लाखांची मदत
दुष्काळग्रस्त ३०० विद्यार्थ्यांना मंदा म्हात्रेंकडून सहा लाखांची मदत

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या ओल्या दुष्काळग्रस्त भागातील ३०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची रोख आर्थिक मदत बेलापूरच्या (नवी मुंबई) भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी केली. विद्यार्थी ओल्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असल्याचे वृत्त पाहिल्यानंतर आ. म्हात्रे यांनी विद्यापीठात येत थेट विद्यार्थ्यांच्या हातातच मदतीचे पाकीट दिले.

विद्यापीठात मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी शिक्षण घेतात. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विद्यापीठातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची यादी बनविण्यास सांगितले. बुधवारी दुपारी २ वाजता आ. म्हात्रे सहकाऱ्यांसह विद्यापीठात दाखल झाल्या. एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी २५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख मदतीचे वाटप केले.

Web Title: 6 lakh assistance to 6 drought-stricken students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.