शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया मोकलची सातासमुद्रापार भरारी, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक : कॅलिफोर्निया येथे पटकावले सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:06 IST

अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील ग्रामीण भागात राहणारी सोनिया मोकल हिने सातासमुद्रावर भरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक मुंबई पोलीस या स्पर्धेमधून अमेरिका कॅलिफोर्निया येथे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आहे.

सुनील बुरुमकर।कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील ग्रामीण भागात राहणारी सोनिया मोकल हिने सातासमुद्रावर भरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक मुंबई पोलीस या स्पर्धेमधून अमेरिका कॅलिफोर्निया येथे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव मोठे केले आहे.सोनिया ही हाशिवरे या गावाची रहिवासी असूून, घरची परिस्थिती बेताचीच, परंतु मनातील जिद्द आणि क्रीडा क्षेत्रातील आवड यामुळे तिने आपल्या क्रीडा गुणांना जोपासले. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच महात्मा गांधी विद्यालय येथे झाले आणि शाळेत असताना तिने धावणे व खो-खो या खेळामध्ये राज्यस्तरीय तर राष्ट्रीय पातळीवर आपली चुणूक दाखवून पारितोषिके मिळविलेली आहेत. शालेय स्पर्धेमध्ये तिला शाळेतील शिक्षक गायकवाड यांनी मार्गदर्शन करून सहकार्य के ले. दहावीनंतर पुढील शिक्षण पीएनपी कॉलेज, वेश्वी येथे झाले. त्या वेळी तिला तेजस म्हात्रे या प्रशिक्षणार्थींचे मार्गदर्शन मिळाले.शिक्षण झाल्यानंतर २०११ साली ती मुंबई पोलीसमध्ये भरती झाली. पोलीसमध्ये सुद्धा आपल्या क्रीडामध्ये नैपुण्य दाखविले. त्यामध्ये तिची आंतरराष्ट्रीय पोलीस फायर खेळ, लॉसएंजल्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये निवड झाली.या स्पर्धेमध्ये ८०० मीटरमध्ये गोल्ड, १५०० मीटरमध्ये सिल्व्हर मेडल तर ३००० मीटरमध्ये स्टेपलचेस सिल्व्हर मेडल अशी पदके मिळाली. या वेळी तिचे प्रशिक्षणार्थी भीमाजी मोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे तिचे पोलीस खात्यासह अलिबाग तालुक्यात तिचे कौतुक करण्यात आले.सोनियाला तिचे आई-वडील आणि बहीण यांचे चांगले सहकार्य मिळाले अणि त्यांच्यापासूनच तिला प्रेरणा मिळाली असे तिने सांगितले.>सोनियाला तिचे आई-वडील आणि बहीण यांचे चांगले सहकार्य मिळाले अणि त्यांच्यापासूनच तिला प्रेरणा मिळाली असे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर भविष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये यापेक्षा उत्तम कामगिरी बजावण्याचे तिचे लक्ष्य आहे. त्या पद्धतीने ती मेहनत करत आहे.