शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत पुन्हा "काँग्रेस राज"

By admin | Updated: April 4, 2017 00:21 IST

भाजपाला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद पटकाविल्यानंतर सोमवारी चार विषय समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही ...

विषय समिती निवडणूक : सुशीला कुकडे, वनिता पाल, जयंत देशमुख, बळवंत वानखडेंची वर्णीअमरावती: भाजपाला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद पटकाविल्यानंतर सोमवारी चार विषय समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आणि शिवसेना या आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला. चारपैकी दोन समित्या काँग्रेसने राखल्या, तर राष्ट्रवादी व रिपाइंलाही सत्तेत वाटा मिळाला. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या वनिता पाल, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशीला कुकडे यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे जयंत देशमुख आणि रिपाइंचे बळवंत वानखडे यांची विषय समिती सभापती म्हणून निवड झाली आहे. या दोघांसह उपाध्यक्षांचे खातेवाटप येत्या सर्वसाधारण सभेत केले जाणार आहे.डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सोमवारी चार विषय समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी १० वाजेपासून प्रारंभ करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस आघाडी समर्थित राष्ट्रवादीच्या समाज कल्याण सभापतीपदाचे उमेदवार सुशीला कुकडे यांनी ३३ मते प्राप्त करून विजय मिळविला. त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेचे दिनेश टेकाम यांचा ६ मतांनी पराभव केला. टेकाम यांना २६ मते मिळालीत. महिला व बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीत काँगेसच्या वनिता पाल यांनीही ३३ मते प्राप्त करून भाजप समर्थित राष्ट्रवादीच्या सीमा घाडगे यांचा ६ मतांनी पराभव केला. दोन विषय सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे जयंत देशमुख यांना ३३ तर भाजपा समर्थित लढा संघटनेच्या गौरी देशमुख यांना २६ मिळालीत. दुसऱ्या विषय समिती सभापतीपदासाठी काँग्रेस युतीचे रिपाइंचे उमेदवार बळवंत वानखडे यांनाही ३३ मते मिळालीत. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या शिल्पा भलावी यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत तटस्थ भूमिका बजाविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी मात्र सभापती पदासाठीच्या निवडणूक काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या बाजूने मतदान केले. सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेत ५९ सदस्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रिया उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, सहायक अधिकारी तहसीलदार अनिरूध्द बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रमोद देशमुख, प्रकाश माहुरे, नवनाथ तायडे, विजय शेलूकर, नीलेश तालन, झेडपीचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांनी सचिवपदाची जबाबदारी सांभाळली.झेडपीचे तख्त यापूर्वी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने विषय समिती सभापती पदासाठी पडद्यामागे राजकीय हालचाली चालविल्या होत्या. मात्र, काँग्रेस प्रारंभीपासूनच सावध पावले टाकीत असल्याने भाजपला कोणतीही राजकीय संधी देण्यास वाव मिळाला नाही. परंतु राज्यात भाजपची सत्ता असल्याने काही तरी वेगळी राजकीय खेळी होईल, ही ंिचंता काँग्रेसच्या नेत्यांना अगोदरपासून होती. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटपर्यत संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र सभागृहात अनुभवता आले. मात्र, काँग्रेसने ‘नहेले पे दहेला’ ही राजकीय खेळी करून भाजप व मित्रपक्षाला कोणतेही पद वाट्याल्या येऊ दिली नाही, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले. सभापती पदाच्या निवडणूकीत दगा फटका होऊ नये यासाठी आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख, माजी आ. संजय बंड, केवलराम काळे, रिपाइंचे राजेंद्र गवई यांच्यासह नेते लक्ष ठेवून होते.