शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
3
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
4
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
5
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
6
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
7
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
8
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
9
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
10
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
11
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
12
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
13
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
14
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
15
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
16
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
17
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
18
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
19
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
20
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कनिष्ठ सहायक, रोखपालाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

By admin | Updated: February 17, 2015 00:53 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या निलंबित कनिष्ठ सहायक, रोखपालाने सेवा कालावधीत

अमरावती : जिल्हा परिषदेच्या निलंबित कनिष्ठ सहायक, रोखपालाने सेवा कालावधीत २८ लाख १४ हजार ९४६ रूपयांचा अपहार केला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी संजय गोपाळ गिरी याच्याविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी चौकशी व अंकेक्षण अहवालाचा आधार घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सन २०१४ मध्ये काही दिवस गिरी यांच्याकडे कनिष्ठ सहायक व रोखपालपदाची जबाबदारी प्रशासनाने दिली होती. आर्थिक नोंदीचे ५९७०१ ते ५९८०० अशा शंभर पावत्यांचे संपूर्ण पुस्तक गहाळ केले. आर्थिक व्यवहार हाताळताना प्राप्त धनादेशाची नोंदही घेतली गेली नाही. रोकडवहीत जमा-खर्चाच्या रकमा निर्धारित वेळेत जमा केलेल्या नाहीत. ज्या एलआयसी आणि पीपीएफच्या रक्कमा कर्मचारी व अधिकाऱ्याच्या वेतनातून दरमहा कपात केल्या गेल्या त्याचा पैसाही त्यांनी वापरला त्यामुळे हा पैसा शासकीय तिजोरीत भरण्यास विलंब झाला. ही बाब अंतर्गत चौकशीतून उघडकीस आली. कंत्राटी ग्रामसेवकाकडून आलेल्या सुरक्षा ठेवीची नोंदवहीच गहाळ आहे. याशिवाय २६ नोव्हेंबर २०१२ ते २० डिसेंबर २०१५ या दरम्यान विविध विभाग व पंचायत समिती कार्यालयाचे पुरवठा आदेशही संबंधित कनिष्ठ सहायकाने गहाळ केले आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक चौकशी समिती नेमली मात्र आवश्यक दस्तऐवज गिरी यांनी समितीसमोर सादर केले नाही त्यामुळे गहाळ दस्ताऐवज व पावती पुस्तकातील नमूद आर्थिक घोळ २८ लाखावर आहे. (प्रतिनिधी)