शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीच्या तिजोरीत ५० कोटींचा निधी

By admin | Updated: December 22, 2015 00:12 IST

शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

वाटप खोळंबले : ग्रामपंचायतींना निधीची प्रतीक्षाअमरावती : शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषदेला ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असला तरी याचे वाटप मार्गदर्शक सूचनांच्या कात्रित अडकले आहे. मार्गदर्शक सूचना झाल्यानंतर ग्रामपंचायतींना त्याचे वाटप होणार आहे. १४व्या वित्त आयोगातून केंद्र सरकारने महाराष्ट्राला साधारणपणे साडेपाच हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. त्याचा पहिला हप्ता राज्याला प्राप्त झाला असून त्याचे वाटप करण्यात आले आहे. यातून अमरावती जिल्हा परिषदेच्या वाट्याला ५० कोटी रुपये प्राप्त झाले. पूर्वी हा निधी वाटपाचे अधिकार जिल्हा परिषदेला होते. त्यामुळे ज्याची सत्ता असते किंवा पदावरील व्यक्ती आपल्या मतदारसंघातील कामांना प्राधान्य देत होते. त्यामुळे ज्या ठिकाणी कामे झाली आहेत. अशाच ठिकाणी पुन्हा कामे सुचविण्याचे प्रकार घडू लागले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाने निधी वाटपाचे निकष बदलले. जिल्हा परिषदेचे अधिकार काढून घेण्यात आले. लोकसंख्यानिहाय व गावाच्या क्षेत्रफळावर आधारित ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना फारसा हस्तक्षेप करता येणार नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीबाबतही अशीच ओरड असल्याने पूर्वी एकत्रित निधी जिल्हा परिषदेला मिळत होता. पण आता जिल्हा परिषद प्रतिनिधी म्हणून ज्या सदस्यांची नियोजन मंडळावर निवड झाली आहे त्यांना निधी दिला जातो. त्यामुळे या ठिकाणीही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. १४व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचे वाटप करताना लोकसंख्येचा आणि गावाच्या क्षेत्रफळाचा विचार करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या निधीतून लोकसंख्येनुसार ९० टक्के रक्कम आणि क्षेत्रफळानुसार १० टक्के रक्कम देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)