धावत्या ऑटोरिक्षातून पडल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:11 IST2021-04-17T04:11:50+5:302021-04-17T04:11:50+5:30

अमरावती : नांदगावपेठ उड्डाणपुलावर धावत्या प्रवासी ऑटोरिक्षातून मद्यधुंद इसम तोल गेल्याने रस्त्यावर कोसळला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नागपूर ...

Young man dies after falling from autorickshaw | धावत्या ऑटोरिक्षातून पडल्याने युवकाचा मृत्यू

धावत्या ऑटोरिक्षातून पडल्याने युवकाचा मृत्यू

अमरावती : नांदगावपेठ उड्डाणपुलावर धावत्या प्रवासी ऑटोरिक्षातून मद्यधुंद इसम तोल गेल्याने रस्त्यावर कोसळला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा १० एप्रिल रोजी मृत्यू झाला. संदीप सदाशिव मेश्राम (२३, रा. जळका शहापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

क्षुल्लक कारणावरुन महिलेस शिवीगाळ

अमरावती : लहान मुलाला मारहाण का केली, या कारणावरुन भांडण करून एका महिलेने दुसऱ्या महिलेस अश्लील शिवीगाळ केल्याची घटना फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील एका नगरात १४ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध भादंविचे कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------

बडनेरा पोलिसांनी दोन ठिकाणी दारू पकडली

अमरावती : बडनेरा पोलिसांनी इंदिरानगर व जुनीवस्तीतील कंपासपुरा येथे गुरुवारी सात हजार रुपये किमतीची अवैध दारूसाठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. इंदिरानगर येथे अफरोज खान मन्नान खान (२७, रा. गवळीपुरा) याच्याकडून ५०० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. कंपासपुरा येथील सुनील नागोराव चव्हाण (३०) याच्या ताब्यातून ६ हजार ८८० रुपयाची अवैध दारु जप्त करण्यात आली.

--------------------------------------------------

चिचफैल येथे दारु जप्त

अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील चिचफैल येथील शासकीय शौचालयनजीक पोलिसांनी गुरुवारी ४०० रुपयांची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी आरोपी सूरज शिवकुमार तिवारी (३०, रा. चिचफैल) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Young man dies after falling from autorickshaw