शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ वळण मार्गाची निर्मिती होणार

By admin | Updated: September 13, 2014 00:55 IST

बेलोरा विमानतळाचे नुतनीकरण आणि विस्तारीकरणात आडकाठी ठरणारा बडनेरा ते यवतमाळ या राज्य मार्गाचे नव्याने वळण मार्ग निर्माण केला जाणार आहे.

अमरावती: बेलोरा विमानतळाचे नुतनीकरण आणि विस्तारीकरणात आडकाठी ठरणारा बडनेरा ते यवतमाळ या राज्य मार्गाचे नव्याने वळण मार्ग निर्माण केला जाणार आहे. अकोला महामार्गाहून ४ कि.मी. लांबीचा हा वळण मार्ग पुढे जळू या गावालगत काढला जाणार आहे. सुमारे १३.२८ कोटींचा खर्च अपेक्षित असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.अमरावतीच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण तांत्रिक अडचणीत सापडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या वळण मार्गाचे निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या मार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या जमीनीचे हस्तातंरण करण्यात आले आहे. या वळण मार्गाच्या निर्मितीकरीता शासनाने मान्यता प्रदान करावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. शासनाने या वळण मार्गाच्या निर्मितीला मान्यता देताच हा मार्ग युद्धस्तरावर निर्माण केला जाईल, असे बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यानी सांगितले. बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण करताना ६०० मिटर लांबीचा जुना यवतमाळ मार्ग विमानतळाच्या सीमेत जाणार आहे. यापूर्वी शासनाने २००९ मध्ये या वळण मार्गाच्या निर्मितीकरीता मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणांमुळे त्यावेळी हा यवतमाळ वळण मार्ग निर्माण होऊ शकला नाही. अखेर शासनाने नव्याने या वळण मार्गाचे सुधारीत दरपत्रक पाठविण्याचे कळविले. त्यानुसार ४ कि.मी. लांबीचा नवा वळण मार्ग निर्मितीच्या सुधारीत प्रस्तावात १३ कोटी २८ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला कळविले आहे. जुना यवतमाळ मार्ग बंद करीत असताना बेलोरा विमातळासमोरील मार्ग रहदारीस खुला राहिल, अशी माहिती आहे. नवा वळण मार्ग निर्मितीला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. यवतमाळ मार्गावरील जळू या गावचे नव्या वळण मार्गामुळे काहीअंशी वैभव हरपण्याची भीती आहे. परंतु बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्यात आल्यात ते शेतकरी आजही विमानतळाच्या विस्तारीकरणाची आस लावून आहेत. शासनाची उदासीनता आणि निधीची वाणवा या दुहेरी कात्रीत बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, नुतनीकरण रखडल्याचे चित्र आहे. मात्र नव्याने राज्य शासनाने विमातळाचे विस्तारीकरणाचे धोरण हाती घेतल्याने बेलोरा विमानतळाचे आता विस्तारीकरण होणार असल्याचे संकेत आहेत. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून यवतमाळ मार्गाचे वळण रस्ता निर्मितीचे कार्य हाती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.