शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त स्कूल वाहनधारकांवर यशोमती ठाकूर संतापल्या

By admin | Updated: July 8, 2016 00:04 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे,

आरटीओला इशारा : अन्यथा आंदोलन करू!
तिवसा : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात गृहविभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे कठोर पालन करण्यात यावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. याबाबत त्वरित अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरात व ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांच्या ने-आण करणाऱ्या स्कूल बसला हलगर्जीपणा व बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. यापैकीच चार वर्षापूर्वी शहरातील नवसारी परिसरात झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला असून इतकी भीषण घटना घडल्यानंतरही याबाबत परिवहन विभाग हा विषय गांभीर्याने का घेत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावर थातूर-मातूर कार्यवाही करून सुरक्षित वाहतुकीसंदर्भात असलेल्या नियमांचे कठोर पालन होत नसल्याबाबतचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, शाळेतीेल मुलींची सुरक्षित ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबा निश्चित करणे या बाबींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेची एक परिवहन समिती असते. परंतु ही समिती निर्माण करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात समिती कार्यान्वित झाली का याचा आढावा घेण्याची मागणी करुन ज्या बसमध्ये विद्यार्थिनी असतात. त्या बसध्ये स्त्री सहवर्ती ठेवणे कायद्याने बंधनकारक असताना हा कायदा राजरोसपणे मोडण्यात येत असल्याचे ही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
सुरक्षित वाहतूक ही जबाबदारी आरटीओ, पोलीस विभाग व शिक्षण विभागाची असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अपेक्षित असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅन व आॅटोमध्ये जनावरांप्रमाणे कोंबून नेले जात असल्याचे दिसूनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येत नही. ही बाब निश्चितपणे संतापजनक असल्याचे सांगून हा अघोरी प्रकार आणखी किती दिवस घालून निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे का, असा रोखठोक सवाल उपस्थित करून याबाबत कठोर कार्यवाही व्हावी व नियम पायदळी तुडवणाऱ्या स्कूल बसमालक व चालकांवर नियमांचे पालन करण्याबाबत त्वरित निर्णय होण्यासोबतच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. (प्रतिनिधी)