शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आठ आरोग्य लेखाशीर्षातील कामे : प्रशासकीय मान्यता यादीत नमूद

By admin | Updated: January 5, 2017 00:10 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात कोटींचा अपहार झाल्याची बाब उजेडात आली आहे.

पीएचसीच्या कामात कोटींचा अपहार ! अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाद्वारे प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामात कोटींचा अपहार झाल्याची बाब उजेडात आली आहे. ८ आरोग्य लेखाशिर्षात एकाच विकासकामाची चार ते पाच वेळा देयके काढण्यात आली आहेत, हे विशेष. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त १३ कोटी १३ लाखांच्या निधीत मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत सन २०१५-१६ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे एकच काम वारंवार विविध नावाने दाखवून तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. झेडपीच्या आरोग्य विभागाला राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात आरोग्य संस्थांची स्थापना व परीक्षण बांधकामांसाठी १३ कोटी १३ लाख २८ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार मेळघाटातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची दुरूस्ती व बांधकामासाठी कामांचे नियोजन करून त्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली. यानुसार याकामांसाठी ३ ते ५ लाख रूपयांप्रमाणे निधी देण्यात आला. यासाठी प्रशासकीय मान्यता व इतर सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. प्राप्त १३ कोटी १३ लाख रूपयांमधून बिजुधावडी, साद्राबाडी, हरीसाल, सेमाडोह, हातरू, धूळघाट रेल्वे, काटकुंभ आदी ठिकाणी कामे करण्यात आलीत. यापैकी बरीच कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे अद्याप सुरू झाली नसल्याचे यादीत दर्शविण्यात आले आहे. एकटया बिजुधावडी या एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १ कोटी ४८ लाखांची कामे एकाच वर्षात मंजूर केली आहेत. विशेष म्हणजे एकच काम विविध ठिकाणी वारंवार प्रस्तावित दाखवून त्या कामांसाठी निधीची पार वाट लावल्याचे दिसून येते. ई-टेंडरिंग नसल्याने घोळ शासनाने जिल्हा परिषदेला आरोग्य सुविधेसाठी कोटयवधीचा निधी उपलब्ध करून दिला. यानुसार विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार यानिधीत सर्वाधिक पैसा मेळघाटक्षेत्राला मिळाला. त्यात कामे मंजूर केली गेली. विशेष म्हणजे बहुतेक कामे ही ३ लाखांची असल्यामुळे या कामांचे ई-टेंडरिंग केले जात नाही. परिणामी यात पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सन २०१५-१६ मध्ये कामे केल्यानंतर काही ठिकाणची कामे पुन्हा सन २०१६-१७ मध्येही प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘आठ आरोग्य’ अंतर्गत मेळघाटसह इतर ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची चौकशी करू. निधीमध्ये अपहार व कामांमध्ये अनियमितता आढळल्यास दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. कोणाचीही गय करणार नाही. - सतीश उईके, अध्यक्ष जिल्हा परिषद