शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांनी बजावले ठाणेदाराचे कर्तव्य

By admin | Updated: March 9, 2017 00:14 IST

महिलादिनी महिलांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने बुधवारी शहरातील दहाही ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकांचा पदभार सोपविण्यात आला होता.

सन्मान :भातकुली ठाण्यात स्टेशन डायरीचा कार्यभारअमरावती : महिलादिनी महिलांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने बुधवारी शहरातील दहाही ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकांचा पदभार सोपविण्यात आला होता. शिवाय भातकुली ठाण्यात महिला पोलीस नाईकला स्टेशन डायरीचे कामकाज सोपविले होते. हा आगळावेगळा उपक्रमाची अमंलबजावणी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने करण्यात आली. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील १० पोलीस ठाण्यांत विविध पदांवर महिला पोलीस कार्यरत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस पुरुषांप्रमाणे कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने बुधवारच्या महिला दिनी शहरातील सर्वच ठाण्याचा कार्यभार महिला पोलिसांकडे सोपविण्यात आला. ठाणेदारांची धुरा सांभाळताना महिला पोलीस उपनिरीक्षक योग्यरित्या कर्तव्य बजावू शकतात. त्यादृष्टीने महिला पोलिसांकडे एक दिवसासाठी ठाण्याचे कामकाज सोपविले. यात कोतवाली ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांनी सांभाळला. त्याचप्रमाणे बडनेरा ठाण्याचा प्राजक्ता धावडे, राजापेठचा मनीषा सामटकर, फे्रजरपुराचा ज्योती बडेगावे, वलगाव ठाण्याचा माधुरी उंबरकर, गाडगेनगर ठाण्याचा सुलभा राऊत, नागपुरी गेट ठाण्याचा भारती इंगोले, खोलापुरी गेट ठाण्याचा शुभांगी थोरात व वाहतूक शाखेचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक सुनिता काळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. या सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाण्याचे योग्यरित्या कामकाज सांभाळल्याचे दिसून आले आहे. महिला पोलीस नाईकभातकुली ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर महिला नसल्यामुळे तेथील महिला पोलीस नाईक सुवर्णा टेकाडे यांना स्टेशन डायरीची धुरा देण्यात आली. त्यांनी बुधवारी दिवसभर स्टेशन डायरीचे कामकाज योग्यरित्या सांभाळले. याव्यतिरिक्त नांदगाव पेठ ठाण्यात महिला पोलिसची नियुक्त नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)महिलांचा सन्मान व्हावा, त्यांनीही ठाणेदार पदाच्या कामकाजाचा अनुभव यावा, या दृष्टीने महिला दिनी त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.- दत्तात्रय मडंलिक, शहर पोलीस आयुक्त