शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणामुळे वन्यजीव जेरीस

By admin | Updated: June 2, 2016 01:35 IST

या उद्यानाच्या कुंपणाचा वन्यजीवांना अडसर होत असल्याने काही वन्यप्रेमींनी कुंपण काढण्याची मागणी केली होती. परंतु कुंपण अद्याप काढण्यात आलेले नाही.

हरिण, नीलगाय जखमी : छत्री तलावावर जाताना अडसर, कुंपण केव्हा काढणार ?वैभव बाबरेकर अमरावतीछत्री तलाव मार्गावरील निर्माणाधीन उद्यान वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. या उद्यानाच्या कुंपणाचा वन्यजीवांना अडसर होत असल्याने काही वन्यप्रेमींनी कुंपण काढण्याची मागणी केली होती. परंतु कुंपण अद्याप काढण्यात आलेले नाही. बुधवारी पहाटे या कुंपणाला अडकून हरिण जखमी झाले. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच निलगाय जखमी झाली होती. मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या काही नागरिकांनी जखमी हरणाच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. मात्र, अद्याप वनविभागाला जाग आलेली नाही. त्यामुळे वन्यप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून स्व.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान उभारण्यात येत आहे. उद्यानाच्या भोवताल तारेचे कुंपण लावण्यात आल्याने वन्यप्राण्यांच्या आवागमनाच्या मार्गातच अडथळा निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांना छत्री तलावावर पाणी पिण्यास जाताना त्रास सहन करावा लागतो. त्यांच्याकरिता छत्री तलावचा मुख्य नैसर्गिक जलस्त्रोत आहे. मात्र, तलावाकडे जाताना पशूंना अडसर निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन कुंपण हटविण्याची मागणी मधुबन वन्यजीव सरंक्षण संस्थेच्या नीलेश कंचनपुरे यांनी केली आहे. उद्यानामुळे जर वन्यप्राण्यांना अडसर निर्माण झाला असेल तर पर्यायी मार्ग काढण्यात येईल. त्यासंबधी सूचना सामाजिक वनिकरणाला देण्यात आल्या आहेत. पुढील कारवाई ते करणार असून त्यावर उपाययोजना करणार आहे. - संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बाजू मांडू. मूठभर वन्यप्रेमी उद्यानाचा विरोध करीत असतील तर हे योग्य नाही. नागरिकांनी उद्यानाचा उद्देश समजून घ्यावा. या उद्यानाच्या कुंपणामुळे वन्यप्राण्यांना अडसर होतो, हा मुद्दा चुकीचा आहे. - प्रदीप मसराम, उपसंचालक, सामाजिक वनिकरण.उद्यानाच्या कुंपणामुळे वन्यजीवांना मुक्त संचार करता येत नाही. दररोज या कुंपणाशेजारी वन्यजीव फिरताना दिसून येतात. आज एक हरिण कुंपणात अडकून जखमी झाले. त्याला तत्काळ उपचाराकरिता नेले.-किरण पांडे, नागरिक