शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बायको नोकरीला, नवरा घर सांभाळायला!

By admin | Updated: May 12, 2014 23:07 IST

बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते.

अमरावती : बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबतच तिने गृहकृत्यदक्ष आणि आदर्श सून असणंही मस्ट असतंच; पण नोकरी करून अर्थार्जन मिळवणारी बायको आता नवरोबासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण शहरात हाऊसवाईफ नव्हे, तर हाऊस हजबंडचे प्रमाण वाढल्याने नवरा-बायकोच्या नात्यात कटुता निर्माण होत आहे. पूर्वी गृहिणीचे म्हणजे चूल आणि मूल एवढय़ावरत र्मयादित होते. आता मात्र या गृहिणीचं स्वरूप बदललं आहे. अनेक घरांमध्ये नवरोबांवर चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे; मात्र अशातही बायकाच नोकरी आणि कुटुंब अशा दोन्ही पातळ्यांवर लढा देत असल्याने, कुटुंबामध्ये काही प्रमाणात समतोल राहत आहे. एकाच वेळी आपल्या कामाच्या वेळा सांभाळायच्या, मुलांनाही वेळ द्यायचा. कुटुंबीयांकडेंही लक्ष पुरवायचे, शिवाय एकमेकांना समजूनही घ्यायचे या सगळ्या पातळ्यांवरची कसरत ते लीलया पार पाडत आहेत; परंतु काही नवरोबांचा यामुळे इगो दुखावत असल्याने त्यांच्या नात्यात दरार निर्माण होत आहे.

कामांची

घरातली

विभागणी कामं ही स्त्रियांनीच करायची, असा पूर्वी दृष्टिकोन असायचा; परंतु आता स्त्रिया नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असल्याने दोघांमध्ये कामाची विभागणी केली जात आहे. सकाळी नऊ-साडेनऊ वाजेदरम्यान स्त्रियांना नोकरीनिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे घरातील संपूर्ण कामे करण्याची जबाबदारी नवरोबांवर येत आहे. त्यामध्ये घर आवरणे, घासलेली भांडी जागेवर लावणे, मुलांचं आवरणे, निरनिराळी बिलं भरणे, बाजार आणणे, पाणी भरणे, मुलांना शाळेतून घरी आणणे, त्यांना जेवण देणे, भांडी घासून ठेवणे आदी कामे नवरोबांना करावी लागत आहेत. सकाळी ऑफिसला निघण्याच्या वेळेपर्यंंत जेवढे शक्य होईल तेवढी कामे स्त्रियाच करून ठेवतात; मात्र ऑफिसला गेल्यानंतर उर्वरित कामे नवरोबाला करावी लागतात.

नवर्‍यापेक्षा

घरात

बायकोचा पगार अधिक दोघेही नोकरीला असतील अन् नवर्‍यापेक्षा बायकोचा पगार अधिक असेल तरीही दोघांमध्ये टोकाचे मतभेद होण्याची शक्यता असते. काही नवरोबा तर बायकोपेक्षा कमी पगार असल्याने थेट नोकरीलाच रामराम ठोकून दुसरी जादा पगाराची नोकरी शोधण्यात धन्यता मानतात. बायकोपेक्षा कमी पगार म्हणजे एकप्रकारे कमीपणाचे लक्षण समजले जात असल्याने दोघांपैकी एक तरी नोकरीला रामराम ठोकतो.