शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

निबंधक कधी वापरणार न्यायिक अधिकार ?

By admin | Updated: June 28, 2015 00:26 IST

दोन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. पीककर्ज देण्यास बँकांनी हात आवरला आहे.

शेतकऱ्यांचे शोषण : अवैध सावकारांना कोण घालणार लगाम ?गजानन मोहोड अमरावतीदोन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. पीककर्ज देण्यास बँकांनी हात आवरला आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे. या प्रतिकूल स्थितीचा फायदा घेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील किमान दोन हजार अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून सोडविण्यासाठी तालुका पातळीवर निबंधकांना सहकार विभागाने न्यायालयीन अधिकार प्रदान केले आहेत. या अधिकाराचा वापर करण्यात येत नसल्याची शोकांतिका आहे. या पार्श्वभूमीवर या अवैध सावकारांना कोण घालणार लगाम, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ अन्वये सहकार विभागाचा तालुका पातळीवरील सहायक निबंधक व कलम १६ अन्वये प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी यांना दिवाणी न्यायालयास असलेले न्यायिक अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या अधिकाऱ्यांना एखादा व्यक्ती कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन अवैध सावकारीचा व्यवसाय करीत आहे किंवा विनापरवाना सावकारी करीत आहे तर अशा व्यक्तीची पूर्वसूचना देऊन विनावॉरंट त्याच्या परिसराची, आवाराची, घराची व दुकानाची झडती घेता येऊन ते अधिकारी आवश्यक प्रश्न विचारू शकतात. शासनाने तालुका पातळीवर निबंधकास व्यापक अधिकार प्रदान केले असताना या अधिकाऱ्याकडून केवळ महिन्याकाठी परवानाधारक सावकाराच्या दप्तराची तपासणी करण्यात येते. अवैध सावकाराच्या विरोधात या अधिकाऱ्यांनी स्वत:हून कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही. खरिपाच्या तोंडावर गावागावांत अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांचे शोषण होत असताना प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. महिन्याकाठी ४० टक्के व्याजदरशेतकरी, भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या शोषणाचे ग्रामीण भागात नवनवीन फंडे आहेत. एखाद्या भाजीपाला विक्रेत्याला १० हजारांचे कर्ज हवे असल्यास परत करण्यास आठवडभराचा अवधी असतो. व्याजापोटी हजार रूपये मुद्दलमध्ये कपात केली जाते. प्रत्यक्षात गरजूला ९ हजार मिळाले असताना एका आठवड्यात त्याला १० हजार द्यावे लागतात. आठवड्याचे १० टक्के म्हणजेच महिन्याचे ४० टक्के व वर्षाचे ४८० टक्के व्याज आकारणी थक करणारी आहे. कृषी केंद्रांकडून व्याज आकारणीशेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे पुनर्गठन नाही. नव्याने पीककर्ज नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. बी-बियाणे, खते ही शेतकऱ्यांना कृषी केंद्राकडून उधारित मिळतात. परंतु दोन महिन्यांनंतर या रकमेवर व्याजाची आकारणी सुरू होते. २ ते ६ टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केल्याची उदाहरणे ग्रामीण भागात आहेत.पेरणीसाठी पैसा देऊन व्यापारी घेतात कापूसपेरणीच्या काळात शेतकऱ्यांची नड (गरज) पाहून त्यांचे शोषण केले जाण्याचे अनेक प्रकार वाढत आहेत. लहानमोठ्या गावांतील खासगी व्यापारी हे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, पेरणी व मशागतीसाठी आगाऊ पैसे देतात. परंतु सोयाबीन, कापूस निघाल्यानंतर प्रथम व्यापाऱ्याला मिळेल त्या भावात पीक देऊन बाकी चुकती करावी लागते, काही व्यापारी ही रक्कम व्याजासहीत वसूल करतात. पांढरपेशेही उतरले सावकारीच्या व्यवसायातगावपातळीवरील बहुतांश शिक्षक, प्राध्यापक, सरकारी कर्मचारीदेखील शेतकऱ्यांची निकड पाहून त्यांना तारण, धनादेश किंवा कोष मुद्रांक यावर ३ ते ६ टक्के दराने व्याज घेऊन अवैध सावकारी करतात. सध्याचे पेरणीचे दिवस हे शेतकऱ्यांचे अडचणीचे असल्याने नोकरदार वर्गानेही शेतकऱ्यांचे शोषण करणे सुरू केले आहे.अवैध सावकारांचेही सावकारमोठ्या गावात बेनटेक्स ज्वेलर्स, ज्वेलर्स, दागिने पॉलीश करण्याचे दुकान अशा अनेक प्रकारच्या दुकानांत विनापरवाना सावकारीचा व्यवसाय फोफावला आहे. सोने, ऐवज आदी तारण ठेवून ३ ते ५ टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी करण्यात येते. ऐवजाच्या किमतीच्या निम्म्यात पैसे दिले जातात. या सावकारांनाही कर्ज देणारे अवैध सावकार आहेत. ते एक ते दोन टक्के व्याजाने या अवैध सावकारांना रक्कम देतात.