शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचा गहू, तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांच्या घशात

By admin | Updated: December 6, 2014 22:39 IST

तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानदार कार्यरत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून येथील पुरवठा निरीक्षक नियमितपणे दुकानांची तपासणी करीत नसल्याने गरिबांचा गहू,

संदीप मानकर - दर्यापूर
तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानदार कार्यरत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून येथील पुरवठा निरीक्षक नियमितपणे दुकानांची तपासणी करीत नसल्याने गरिबांचा गहू, तांदूळ काही स्वस्त धान्य दुकानदारंच्या घशात जात आहे. यामध्ये लाखो रूपयांचा अपहार होत असल्याची परिसरात चर्चा आहे.
शासनाने फेब्रुवारी महिन्यापासून अन्न सुरक्षा योजना लागू केली. या अंतर्गत लाभार्थ्यांना २ रूपये किलो दराने २० किलो गहू व ३ रूपये किलो दराने १५ किलो तांदूळ मिळते. तसेच १३.५० पैसे किलो दराने प्रती व्यक्ती ३७५ ग्रॅम साखर देण्याची तरतूद आहे. तालुक्यात ७०८४ लाभार्थी आहेत. तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी (बीपीएल) या योजनेंतर्गत एका व्यक्तीला ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देण्याची तरतूद आहे. तर केशरी शिधापत्रिका (एपीएल) धारकांना उपलब्ध कोट्यानुसार ७ रूपये २० पैसे किलो दराने गहू व ९.६० पैसे किलो या दराने तांदूळ देण्यात येतो.
दर महिन्याला प्राधान्य कुटुंबातील १८,५९० लाभार्थ्यांना २ हजार ८८६ क्विंटल गहू व १ हजार ९२४ क्विंटल तांदूळ शासनामार्फत दर महिन्याला देण्यात येतो तर अंत्योदयच्या लाभार्थ्यांना १ हजार ४१७ क्विंटल गहू व १ हजार ६३ क्विंटल तांदूळ वितरित केला जातो. परंतु हे धान्य खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते का, हा खरा प्रश्न आहे. अनेकदा स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्याचा कोटा उपलब्ध असतानाही अनेक दुकानदार धान्य मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांना सांगून त्यांच्या तोंडचा घास खासगी व्यापाऱ्यांना विकून लाखोंची माया जमवीत असल्याचे दिसते. यामुळे काही स्वस्त धान्य दुकानदार गब्बर झाले आहेत. त्यांच्या सोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे त्यांची नियमित नोंदवही तपासली जात नाही, अशी देखील परिसरात चर्चा आहे.
काही केरोसिन विक्रेतेसुध्दा केरोसिनचा काळाबाजार करून आॅटोचालकांना जादा दराने केरोसिन विकत असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळेच शिंगणवाडी येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला मारहाणीची घटना ताजी आहे. त्यामुळे या प्रकरणाची उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.