शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील २७ हजारांवर लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीत काय आढळल्यात चुका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:54 IST

Amravati : केवायसी चुकलेल्या बहिणींना अंगणवाडी सेविकांना द्यावे लागणार लेखी स्वयंघोषणापत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
ई केवायसी प्रक्रियेत विचारलेल्या एका गोंधळाच्या प्रश्नामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २७ हजार ५४४ मानधन मिळाले नाही.

त्यामुळे आता मानधन मिळविण्यासाठी लाडक्या बहिणींना लेखी स्वयंघोषणापत्र संबंधित परिसरातील अंगणवाडी सेविकांकडे द्यावे लागणार आहे. यानंतर १४ तालुक्यांचे सीडीपीओ आणि महापालिका क्षेत्रातील तीन शहरी प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत ऑनलाइन यादीतील नावानुसार ई-केवायसीमध्ये दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यामुळे ई-केवायसीमुळे लाभापासून वंचित असलेल्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना सरसकट १ हजार ५०० रुपये अनुदान दिले जात आहे; परंतु शासनाने याकरिता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यानुसार पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली; परंतु केवायसी करताना लाभार्थीनी पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला. परिणामी योजनेचा लाभबंद झाल्याने लाडक्या बहिणींची ओरड वाढली. त्यामुळे शासन याची दखल घेत आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार लाभार्थी पात्र, अपात्र आहेत का? पडताळणी होईल. यासाठी अंगणवाडी सेविकांकडे लेखी स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे. यानंतरच चुकीच्या केवायसीमध्ये संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी हे ऑनलाइन दुरुस्ती करणार आहेत.

दृष्टिक्षेपात चुकलेल्या केवायसीचे लाभार्थी

  • २१ वर्षे वयोगट- १०३९८,
  • ६५ वर्षे वयोगट - २७७५
  • लाभार्थीऐवजी पतीच्या खात्यात पैसे जमा - ३०६
  • ई-केवायसीत चुका असलेल्या लाभार्थी - २३०६५
  • पत्ता नसलेल्या लाभार्थी - ३०२२

 

"लाडकी बहीण योजनेतील चुकांची दुरुस्तीसाठी संबंधित महिलांनी अंगणवाडीसेविका यांच्याकडे लेखी स्वयंघोषणापत्र भरून द्यावे, यानंतर प्राप्त यादीनुसार संबंधित नावातील सीडीपीओमार्फत ऑनलाइन दुरुस्ती कार्यवाही केली जाईल."
- अतुल भंडागे, महिला व बालविकास अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: E-KYC Errors Delay Payments for 27,000 'Ladki Bahini' Beneficiaries

Web Summary : E-KYC errors, stemming from a confusing question, have delayed payments for 27,000 women under the 'Ladki Bahini' scheme in Amravati. Beneficiaries must now submit written declarations to Anganwadi workers for online corrections by officials, offering relief to those affected.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAmravatiअमरावतीgovernment schemeसरकारी योजना