शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘बोधीवृक्ष’ नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 22, 2016 00:07 IST

अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

तथागत गौतमबुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार : देशात, देशाबाहेरही पूजनीय ज्ञानवृक्षरोशन कडू  तिवसाअवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दु:ख मुक्तीचा मार्ग शोधून संपूर्ण मानव जातीला दु:खमुक्त होण्यासाठी संदेश दिला, अशा तथागत बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार असलेला आणि बौद्ध धर्मात पवित्र मानला जाणाऱ्या महावृक्षांचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा बोधीवृक्ष म्हणजेच पिंपळवृक्ष.या जुन्या व प्राचीन अशा पिंपळवृक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून हा वृक्ष पर्यावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या विशाल वृक्षाचे पर्यावरणातून नामशेष होणे ही बाब पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक व बाधक ठरत आहे. पिंपळ हे वृक्ष जवळपास प्रत्येक गावात सर्रासपणे पाहायला मिळत असायचा. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेचे पिंपळ व वटवृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले. मात्र त्या पुन्हा ती झाडे लावण्यात आली नाहीत. हा वृक्ष विहिरींमध्ये तसेच विहिरींच्या काठावर मोठ्या प्रमाणात दिसायचे. पण या झाडावरील पक्षांची विष्ठा विहिरीत पडते म्हणून अनेकांनी हे पिंपळ तोडले आहेत. पूर्वी पिंपळ वृक्ष सर्रासपणे दिसायचे, आता मात्र तो मंदिर व स्मशानभूमीच्या आवारात पहावयास मिळतो. मोकळ्या जागेत पिंपळवृक्ष लावल्यास पर्यावरणासाठी निश्चितच फायदा होईल. पिंपळ हा खास करून हळद्या, पोपट, मैना आदी पक्षांचा आवडता वृक्ष आहे. देशात आणि देशाबाहेरही पूजनीय ज्ञानवृक्ष पिंपळवृक्ष मूळचा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या देशातील असून हिंदीमध्ये पिपल, इंग्रजीत होली ट्री तर शास्त्रीय भाषेत फायकस रेलिजीओसा नावाने ओळखला जातो. हा वृक्ष मोरेसी कुळातील असून सर्वाधिक आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. भारत आणि भारताबाहेरही हा वृक्ष पूजनीय मानला जातो. पिंपळवृक्ष हा आयुर्वेद शास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या वृक्षाची मुळे व फांद्या डायबेटीस (मधुमेह) या आजारांवर गुणकारी आहेत. याशिवाय पिंपळवृक्षाच्या पाला शेळा, मेंढ्या आवडीने खातात. वाटसरूंना निवांत बसता यावे म्हणून या वृक्षांच्या बाजूने पार बांधण्याची परंपरा प्राचीन काळापासूनची आहे.आरोग्यासाठी गुणकारी वृक्षपर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील हा वृक्ष खूप महत्त्वाची कामगिरी बजावतो. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड घेऊन शुद्ध प्राणवायू (आॅक्सिजन) देण्याचे महत्त्वाचे काम हा वृक्ष करतो.आरोग्याच्या दृष्टीने हृदयविकाराचे आजार, त्वचारोग आदी आजारांवर देखील हा वृक्ष गुणकारी आहे. पिंपळवृक्ष पानगळ होणाऱ्या वृक्षांमध्ये मोडतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला याची सर्व पाने गळून जातात. बोधीवृक्षाला म्हणजे पिंपळवृक्षाला ‘अश्वत’ म्हणूनही ओळखले जाते. अश्वत म्हणजे कधीही नाश न पावणारा किंवा कधीही नष्ट न होणारा पण आता मात्र पिंपळवृक्षाची कमी होणारी संख्या ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब होऊ लागली आहे. पिंपळवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणून या वृक्षाला ज्ञानवृक्ष मानले जाते.