शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २८ टँकर,२४४ विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:21 IST

जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमेळघाटात टंचाईच्या झळा तीव्र : अमरावती, अंजनगाव, चांदूर रेल्वे, मोर्शी तालुक्यात गावे तहानली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांच्या अडचणीत भर टाकली आहे. जिल्ह्यात सध्या २७ गावांमध्ये २८ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असली तरी टँकरची मागणी दिवसेदिवस वाढत आहे. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २४४ गावांत २४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात यावर्षी तीव्र दुष्काळ आहे. शहरात नळाला दोन दिवसांआड पाणी येते, तर ग्रामीण भागात अतिशय विदारक परिस्थिती आहे. पूर्वी केवळ मेळघाटात टँकरद्वारे पाणीपुरवठा व्यवस्था करावी लागायची. यावर्षी मेळघाटातील गावांसह अमरावती, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, मोर्शी तालुक्यांतील गावांमध्येही पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील २७ गावे आज टँकरवर आहेत. चिखलदरा तालुक्यातील भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहादरपूर, मनभंग, आडनदी, सोनापूर, पिपादरी, खिरपाणी, खटकाली, खडीमल, सोमवारखेडा, मलकापूर, कोरडा, तारूबांदा, लवादा, भांद्री या गावांसह चांदूर बाजारमधील घाटलाडकी, गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.अमरावती तालुक्यातील बोडणा, परसोडा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना, चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर, जळका जगताप, मोर्शी तालुक्यातील लेहेगाव, सावरखेड, आसोना आणि वाघोली आदी गावांमध्ये टँकर सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रीतेश मुंडे यांनी दिली. सदर गावांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या आमला विश्वेश्वर या गावात तीन हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर दिवसातून दोन वेळा पाणी आणून गावातील टाकीत भरतात. दोन्ही टाकीतील पाणी आठवड्यातून एक दिवस नळावाटे गावात पुरवले जाते. गावात सध्या एकच हातपंप आहे. त्याचे पाणीदेखील आटले आहे. जळका जगताप या गावातही दोन दिवसांत टँकर येतो. टँकरचे पाणी टाकीत सोडले जाते. आठवड्यातून एक दिवस नळावाटे येणारे पाणी केवळ अर्धा तास पुरविले जाते, अशी ग्रामस्थांची ओरड आहे. सद्यस्थितीत मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची संख्या वाढली आहे, तर विहीर अधिग्रहणाची जिल्ह्यातील संख्या २४४ वर पोहोचली आहे. यावरून पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे.विशेष दुरुस्तीची ७० गावात ७० कामेतात्पुरत्या पूरक नळ योजनांची कामे जिल्हाभरातील ३८ गावांत सुरू आहेत. नळ योजनांची विशेष दुरुस्तीची ७० गावांत ७० कामे केली जात आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी कामे प्रगतिपथावर असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.