शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रीज कम बंधारा’तून आता पाणी साठवण

By admin | Updated: October 26, 2014 22:32 IST

गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची

अमरावती : गाव, खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पुलांवर बंधारे बांधून पाणी साठवण केली जाणार आहे. त्याकरीता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत ‘ब्रीज कम बंधारा’ साकारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी येथे रविवारी दिली. हा अभिनव उपक्रम भविष्यात शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.नितीन गडकरी हे येथे कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी शासकीय विश्राम भवनात काही भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी निवेदिता चौधरी, जगदीश नाना बोंडे, प्रदीप शिंगोरे, विजय मोहता यांनी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राज्यात हवे होते, असे म्हणताच गडकरी यांनी ‘मी दिल्लेत सेट झालो आहे. देशाचे नेतृत्व करण्याची पक्षाने संधी दिली. त्यामुळे आपण दिल्लीतच खुष आहोत’, असेही ते म्हणाले. गडकरी यांनी केंद्र शासनाने राबविलेल्या लोकाभिमुख योजनांचा पाढा वाचला. विदर्भात उद्योगधंदे नसल्यामुळे विदर्भ आर्थिकदृष्ट्या माघारल्याचे त्यांनी मान्य केले. नव्या योजनांची मुहूर्तमेढ रोवताना रामसेतू निर्माण कार्य हाती घेतले जाणार आहे. राज्यात सिंचन क्षमतेत विदर्भ फारच मागे असल्यामुळे पाणी साठवण करण्यासाठी ‘ब्रीज कम बंधारा’ हा उपक्रम सुरु होत आहे. या अभिनव उपक्रमामुळे लहान-मोठ्या शेतकऱ्यांना बंधाऱ्यातून शेतीसाठी पाणी वापर करता येईल. भविष्यात ही योजना विदर्भातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, असे गडकरी म्हणाले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत गाव-खेड्यातील रस्त्यांवरील छोट्या पूलाचे बांधकाम करुन त्याच भागात बंधारा निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता बंधाऱ्यात साठविले जाईल. गुरा, ढोरांना उन्हाळ्यात पिण्यास पाणी उपलब्ध होईल. मात्र, या बंधाऱ्यातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा वापर करणे सोयीचे होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. देशभरातील ग्रामीण भागात ‘ब्रीज कम बंधारा’ या अभिनव उपक्रमातून पाणी साठवण करण्यावर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून गाव, खेड्यातील रस्त्यांची निर्मिती करण्याचा उद्देश असला तरी छोट्या पुलाचे पक्के बांधकाम करणे, त्याच पुलांवर बंधारा निर्माण करणे जेणे करुन पाणी साठवण करण्याचा मार्ग सुकर होईल, असे गडकरी यांनी सांगितले. विदर्भाच्या विकासावर भरभरुन बोलत असताना गडकरींनी राजकीय भाष्य करण्याचे टाळले, हे विशेष. इतर अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.