शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: May 15, 2016 23:59 IST

मागील आठवड्यात वादळी पाऊस कोसळला. दोन, चार दिवस वातावरणात गारवा जाणवला. मात्र, आता तापमान वाढले असून...

तापमान वाढले : जंगल, वन्यपशुंची काळजी घेण्याचे निर्देशअमरावती: मागील आठवड्यात वादळी पाऊस कोसळला. दोन, चार दिवस वातावरणात गारवा जाणवला. मात्र, आता तापमान वाढले असून पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाण्याच्या स्थितीत आहे. वाढत्या तापमानाचा फटका सर्वाधिक जंगल आणि वन्यपशुंना बसणार आहे. परिणामी वणव्याच्या पार्श्वभूमीवर जंगलात ‘अलर्ट’ जारी करण्यात आले आहे.मागील महिन्यात टिपेश्वर, ताडोबा, पेंच व वडाळी वनक्षेत्राच्या पोहरा जंगलात आग लागून मोठी हानी झाली होती. दोन-तीन दिवसांपासून तापमानात कमालिची वाढ झाली आहे. तप्त उन्हामुळे जीवाची काहिली होत असून जंगलांना आगी लागण्याची भीती वनविभागाने वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर वणव्यावर सॅटेलाईटद्वारे नियंत्रण मिळविण्याची तयारी देखील करण्यात आली आहे.वनविभागाने आधुनिकतेची कास धरली असताना जंगलात लागणाऱ्या वणन्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही आधुनिक पद्धतीचा स्वीकार केला नाही. त्यामुळे दरवर्षी जंगलात लागणाऱ्या आगींवर पारंपरिक पद्धतीने वन कर्मचारी जीव मुठीत घेऊन नियंत्रण मिळवितात. परंतु मनुष्यबळाची वानवा ही खरी समस्या वणवा नियंत्रणासाठी कारणीभूत ठरु लागली आहे. मध्यंतरी दऱ्याखोऱ्यात लागणाऱ्या आगीत मौल्यवान वनस्पती, वन्यपशू, दुर्मीळ वनौषधी, झाडे खाक झाल्याचा घटना घडल्या आहेत. राज्यात दरवर्षी दोन लाख हेक्टरच्या जवळपास जंगल जळून खाक होत असल्याची वनविभागाच्या दप्तरी नोंद आहे. विशेषत: तेंदूचे वृक्ष हे मेळघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ वनक्षेत्रात सर्वाधिक आहे. या वनक्षेत्रात वणव्यामुळे लाखो रुपयांची तेंदू पाने जळून नष्ट होतात, अशी माहिती आहे. वनविभागाकडून वणव्याबाबत जनजागृती केली जाते. अतिरिक्त वनकर्मचारी नेमलेकाही दिवसांपूर्वी पोहरा जंगलात आग लागली होती. मात्र, या आगीत वन्यपशुंची हानी झाली नसली तरी वणव्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिरिक्त वनकर्मचारी नेमण्यात आले आहेत. १५ जूनपर्यंत वणव्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला.जंगलातील आग नियंत्रण करण्यासाठी वनविभाग सज्ज आहे. यापूर्वीच जंगलात जाळ रेषा तयार करण्यात येणार आहे. फायर वॉचमनच्या नियुक्ती देखील झाल्या आहेत. आग नियंत्रणासाठी सयंत्र खरेदीची तरतूद असून ती तोकडी आहे.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.