भरटकलेले माकड वनविभागाच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:36+5:302021-03-04T04:22:36+5:30

फोटो पी ०२ पोहरा पोहरा बंदी : जंगलातून भरकटलेले माकड पोहरा गावात शिरून दोन दिवसांपासून धुमाकूळ घालत होते. त्याला ...

Wandering monkey in the possession of the forest department | भरटकलेले माकड वनविभागाच्या ताब्यात

भरटकलेले माकड वनविभागाच्या ताब्यात

फोटो पी ०२ पोहरा

पोहरा बंदी : जंगलातून भरकटलेले माकड पोहरा गावात शिरून दोन दिवसांपासून धुमाकूळ घालत होते. त्याला मंगळवारी ५० फूट उंच झाडावरून वनविभागाने ताब्यात घेतले.

माकडाने गावात काही जणांना चावा घेण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू पथकाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक फिरोज खान, अमोल गावनेर, सतीश उमक, मनोज ठाकूर यांनी पोहरा गाठून माकडाचा शोध घेतला. ५० फूट उंचीच्या वडाच्या झाडावर बसलेल्या माकडावर रेस्क्यू पथकाने ट्रँक्यूलायझरचा फायर केला. ते बेशुद्ध होताच तेथून जाळीच्या साहाय्याने पकडण्यात आले. त्या माकडाला रेस्क्यू पथकाने ताब्यात घेऊन वडाळी येथील प्राणी संग्रहालयात सुरक्षितपणे सोडले.

Web Title: Wandering monkey in the possession of the forest department