बीपीएल यादीची लाभार्थ्यांना प्रतीक्षा

By Admin | Updated: June 17, 2014 23:56 IST2014-06-17T23:56:49+5:302014-06-17T23:56:49+5:30

महापालिकेतील दारिद्रय रेषेखालील(बीपीएल)च्या यादीची लाभार्थ्यांना अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा आहे. बीपीएल यादीत नावे समाविष्ट नसल्याने या योजनापासून वंचित आहेत. यापूर्वीच्या यादीत धनदांडग्यांची नावे

Waiting for the beneficiaries of the BPL list | बीपीएल यादीची लाभार्थ्यांना प्रतीक्षा

बीपीएल यादीची लाभार्थ्यांना प्रतीक्षा

लाभापासून वंचित: पुर्वीच्या यादीत श्रीमंतांची नावे
अमरावती: महापालिकेतील दारिद्रय रेषेखालील(बीपीएल)च्या यादीची लाभार्थ्यांना अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा आहे. बीपीएल यादीत नावे समाविष्ट नसल्याने या योजनापासून वंचित आहेत. यापूर्वीच्या यादीत धनदांडग्यांची नावे असल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे.
सन-२००५ मध्ये बीपीएल यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. नागरिकांचे राहणीमान, उत्पन्न, घराचा दर्जा, शिक्षण आदी बाबी लक्षात घेत हे सर्वेक्षण पार पडले. बीपीएल यादीत असलेल्या अटी व नियम पूर्ण करणाऱ्या २६ हजार व्यक्तींची यादी तयार करून ती शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आली . मात्र ८ वर्षांचा कालावधी लोटला असताना बीपीएलची यादी मंजूर होऊन परत आली नाही. परिणामी या ८ वर्षांच्या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना अनेक शासकीय योजनापासून वंचित राहावे लागले आहे. बीपीएलच्या यादीत नावे नसल्याने घरकुलाच्या योजनापासून वंचित राहावे लागले. बीपीएलची यादी केंव्हा येणार? याबाबतच्या चौकशीसाठी लाभार्थी महापालिकेच्या पायऱ्या झिजवीत आहेत.
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतंर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी बीपीएल क्रमांक आवश्यक असल्याने अनेक लाभार्थी बीपीएलच्या यादीची प्रतीक्षा करीत आहेत. २६ हजार संख्येपैकी किमान २० हजारापेक्षा जास्त बीपीएलची यादी मंजूर होईल, अशी आशा प्रशासनाला आहे. येत्या २४ जून रोजी बीपीएलच्या यादीविषयी मुंबईत बैठक होत असल्याची माहिती आहे.
मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरिब कुटुंबांची नावे बिपीएल यादीत नसल्यामुळे खरे लाभार्थी यापासून वंचित आहे. बिपीएल यादीत नावे असलेली काही नावे ही मोठ्या कुटुंबातील असल्यामुळे बिपीएलच्या यादीत खऱ्या लाभार्थ्यांचा समावेश व्हावा यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पात्र लाभार्थ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the beneficiaries of the BPL list