वडाळी जंगलाला पुन्हा आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:17+5:302021-03-04T04:24:17+5:30

पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडाळी वर्तुळातील जेवड बीट वनखंड क्रमांक १५ मध्ये बुधवारी अचानक आग लागल्याने ...

Wadali forest fire again | वडाळी जंगलाला पुन्हा आग

वडाळी जंगलाला पुन्हा आग

Next

पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडाळी वर्तुळातील जेवड बीट वनखंड क्रमांक १५ मध्ये बुधवारी अचानक आग लागल्याने चार हेक्टर वनसंपदेचे नुकसान झाले आहे. सकाळी ९ वाजता आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर ती भडकण्यापूर्वीच वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. काटेरी जंगल असल्याने आग आटोक्यात आणतांना वनकर्मचाऱ्यांना अवडघ झाले होते. तरिसुद्धा त्या आगीचा सामना करुन आग विझवितांना काटेरी झुडपांत घुसुन आग विझविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी मोलाची कामगीरी बजावली. काटेरी झाडी झुडपांमुळे ९ वाजता सुरु झालेली आग तब्बल १२ ते १ च्या दरम्यान अथक परिश्रमाने आटोक्यात आणली. आग विझवितांना चार बोलेरो मशीनचा वापर करण्यात आला. या आगील जंगलातील गवत खाक झाले असून झुडपे व मोठ्या वृक्षांनाही आगीचा फटका बसला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात वडाळी वर्तुळ अधिकारी शाम देशमुख, वनरक्षक चंद्रकांत चाेले, व्हि.के.मस्से, प्रफुल फरतोडे, सुनील टिकले, अभिजित कोहळे, वनमजूर ओंकार भुरे, संरक्षण मजूर यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली हे विशेष .

वडाळी पोहरा वर्तुळातील तीन बीट आगीच्या भक्ष्यस्थानी एकाच दिवशी जेवण नीट अंजनगाव बारी बीड उत्तर चोरांबा बीट या तीन बीट वणव्याच्या विळख्यात वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडाळी वर्तुळातील जेवढ पिठ व खंड क्रमांक पंधरा अंजनगाव बारी बीड खंड क्रमांक 24 व वर्तुळातील उत्तर चोरांबा बीट खंड क्रमांक 78 या दोन्ही वर्तुळातील तीन बीट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने वनसंपदेचे नुकसान झाले आहे कुठल्याही वनडे जीवाला हानी पोहोचली आहे हे विशेष

Web Title: Wadali forest fire again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.