शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यातील ‘व्हीआयपी’ रस्ता गेला चोरीला

By admin | Updated: March 7, 2016 00:03 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

अवैध वाहतूक, वाढते अतिक्रमण : पालिका, वाहतूक विभाग झाले आंधळे बहिरे !नरेंद्र जावरे  परतवाडासार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. धारणी मार्गावरील टपाल कार्यालयामागून सा.बां. विभागाच्या विश्रामगृहाकडे रस्ता जातो. या रस्त्यावर होलीक्रॉस मराठी शाळा असून संतोषनगर, गोपालनगर, गौलखेडा कुंभी, मल्हारा, नरसरी हे परतवाडा शहराला लागून असलेली गावे आहेत. दुसरीकडे विश्रामगृहावर सतत जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांचे मुक्काम राहते, व्हीआयपी रस्ता म्हणून त्यांची ओळख आहे. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. पादचाऱ्यासह दुचाकी चालकांना वाढते अतिक्रमण व अवैध वाहतुकीचा थांबा पाहता जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे. कोण करणार कारवाई ?चिखलदरा थांबा नावाने या चौकाची ओळख असून तेथूनच धारणी वजा विश्रामगृहाकडे जाणारा व्हीआयपी रस्ता आहे. अरुंद असलेल्या या रस्त्यावर हॉलीक्रॉस शाळेपर्यंत हातठेले, पानटपऱ्या, कॅन्टीन, हॉटेलचे अतिक्रमण व त्यामुळे मेळघाटसह परिसरात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहने दिवसभर रस्त्याच्या दुर्तफा उभ्या राहत आहेत. अगदी चौकात पालिकेने अ‍ॅटो थांबा दिल्याने अतिक्रमण व अवैध वाहतूक करणारे वाहने रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा करताना दिसून येत आहे. दिवसभर हे चित्र वाहतूक विभाग व पालिका प्रशासनाला दिसत असताना त्यांनी आंधळे व बहिरे झाल्याचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. धारणीकडे जडवाहतूक करणारे ट्रक व य-जा करणारी जड वाहने दिसल्यावरसुध्दा आॅटोचालकांची मुजोरी प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणारी ठरली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह संपलावाहतुकीचा परतवाडा शहरात चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, फिन्ले मिल स्टॉप, बाजार समिती, बसस्थानक, जयस्तंभ चौक, जगदंबा चौक, चिखलदरा, अंजनगाव, बैतूल स्टॉप येथे पहावयास मिळतो. पादचाऱ्यांसह दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन येथून चालावे लागते. याच वाहतूक विभागाने गत महिन्यांत झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात संपूर्ण शहराला नियम शिकविले होते. मात्र सप्ताह संपताच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे गंभीर चित्र आहे. कुठे गेले अतिक्रमण निर्मूलन पथक ?अचलपूर नगरपालिकेत दिवाळीचे फटाके आणि गोडधोड फराळ झाल्यावर दोन अभियंत्यांची नियुक्ती करीत अतिक्रमण निर्मूलन पथक तयार केले होते. व्हीआयपी रस्त्याप्रमाणे शहरातील इतरही वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण वाढले. परिणामी ते अपघाताला कारणीभूत ठरणारे आहे. त्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारा ठरणार आहे. विश्राम गृहाकडे जाणाऱ्या गाड्यांचा ताफासुध्दा या वाढलेल्या अतिक्रमण व बेशिस्त वाहतुकीला कारणीभूत ठरतेय.