शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

विदर्भातील उपसा जलसिंचनाच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 3:37 PM

७२ योजनांतून ४० हजार एकरात सिंचन, शेती गहाण ठेवून शेतक-यांनी उभारले प्रकल्प

प्रशांत काळबेंडे जरूड (अमरावती) : विदर्भातील सिंचनाचा ज्वलंत प्रश्न स्वनिधीने सोडवून शासनाच्या ठरविलेल्या दरापेक्षा अत्यंत कमी खर्चात तब्बल ७२ उपसा जलसिंचन योजना तयार करून शेतकºयांनी सोडवला. सुमारे ४० हजार एकर शेतीचे सिंचन झाले. यासाठी केवळ ४८ कोटी रुपये कर्ज घेतले. हे कर्ज माफ करावे, यासाठी वारंवार शासनदरबारी लोटांगण घेऊनसुद्धा केवळ निराशाच हाती आली आहे.१९९० च्या सुमारास पाण्याअभावी संत्र्यासारखी फळपिके डोळ्यांदेखत वाळत असल्याचे पाहून विदर्भातील ६५३४ शेतकºयांनी आपापल्या परिक्षेत्रात शेती विविध वित्तीय संस्थांना गहाण ठेवून ४८ कोटी कर्ज उभारले आणि तब्बल ७२ सहकारी उपसा जलसिंचन योजना तयार केल्यात. या योजना सुरळीत चालू असताना, प्रशासनाची लालफीतशाही, औदासीन्य, विजेचे अवास्तव बिल, संस्थांचा व्यवस्थापन खर्च आणि वित्तीय संस्थांकडून अवास्तव आकारणी यामुळे ४८ कोटींवरून तब्बल १७५ कोटींचा बोजा शेतकºयांच्या सातबारावर चढला आहे. त्यामुळे तब्बल ६९ योजना बंद करण्यात आल्या आहेत.

आश्वासनांशिवाय काहीच नाही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शासकीय आदेश काढून उपसा जलसिंचनच्या कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली होती. परंतु, ती केवळ वल्गना ठरली. त्यानंतर शासनाने या योजना ताब्यात घेऊन शेतकºयांना कर्जमुक्त करावे, असा ठराव ७ एप्रिल २००४ रोजी विदर्भ वैधानिक विकास मंडळाने राज्यपालांकडे पाठवला होता. २ फेब्रुवारी २०१० रोजीच्या शासननिर्णयाप्रमाणे कृष्ण खोरे योजनेच्या धर्तीवर विदर्भातील शेतकºयांचे कर्ज माफ करावे, असा ठराव तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी मंत्रिमंडळासमोर मांडला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेस-राष्टÑवादी सरकारला धारेवर धरले होते. परंतु, भाजपने या भूमिकेलाही सोयीस्कर बगल दिली आहे. 

१३ किलोमीटरवरून सिंचनअमरावती जिल्ह्यातील जरूड येथील शरद उपसा जलसिंचन योजना ही सर्वांत मोठी आहे. या योजनेत सहभागी ७५० शेतकºयांनी तीन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेती गहाण करून आठ कोटींचे कर्ज उभारले. ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटरवरून १६८० अश्वशक्ती विद्युत यंत्राच्या साहाय्याने शेती सिंचनाखाली आणली आहे. शासनाने वेळीच योजनेवरील कर्ज माफ न केल्यास ही सुस्थितीतील योजना व शेतकरी डबघाईस येतील.

या शेतक-यांना पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक परिस्थिती खालावत असून, नैराश्यातून आत्महत्या वाढल्या आहेत. यामुळे शेवटचा निर्वाणीचा इशारा देत सत्ताधारी व राजकारण्यांचे डोके नांगरू, असा इशारा आम्ही दिला आहे. - मालती दातीर, अध्यक्षएल्गार शरद उपसा जलसिंचन योजना