शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरातील अनियंत्रित वाहतुकीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

दर्यापूर : शहरातील रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेल्या अनियंत्रित वाहतुकीमुळे नवविवाहित महिलेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रोहिणी स्वप्निल ...

दर्यापूर : शहरातील रस्त्याच्या अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेल्या अनियंत्रित वाहतुकीमुळे नवविवाहित महिलेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रोहिणी स्वप्निल काकड (२७, रा. जोगर्डा) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. स्वप्नील गोवर्धन काकड असे किरकोळ जखमी झालेल्या पतीचे नाव आहे.

घटनेतील मृत विवाहिता ही तालुक्यातील उमरीबाजार येथील रहिवासी शेतकरी गोपाल डालके यांची मुलगी आहे. तिचे नोव्हेंबर २०२० मध्येच लग्न झाले होते. लग्नानंतर वैयक्तिक कागदपत्रात दुरुस्ती करण्यासाठी बुधवारी सकाळी एम. एच. २७- ४५९० क्रमांकाच्या दुचाकीने काकड नवदाम्पत्य दर्यापूर येथे आले होते. स्थानिक गांधी चौकातील पेट्रोलपंपासमोरून जाताना पुढून येणाऱ्या एम. एच. ३१ सी. व्ही. १९१२ क्रमांकाच्या ट्रकखाली चिरडल्याने रोहिणी या घटनास्थळीच दगावल्या. दुचाकीवरस्वार पतीला किरकोळ मार लागला असून, जबर मानसिक धक्का बसला आहे.

शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वर्षभरापासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. दोन महिन्यांपासून पूर्णतः अर्धवट परिस्थितीत काम बंद पडले आहे. कामादरम्यान शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करून ठेवलेले आहेत. या कामासाठी वापरलेले साहित्यसुद्धा विखुरलेल्या अवस्थेत पडलेले आहेत. यामुळे संपूर्ण शहरातील वाहतूक पूर्णतः अनियंत्रित झाली आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहेच. परंतु, बांधकाम विभागाचा हलगर्जीपणादेखील या घटनेवरून उघड झाल्याने दर्यापूर शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत असून, प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहे.

बॉक्स

ट्रकवर दगडफेक, प्रसासनाप्रती रोष

नवविवाहितेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकवर दगडफेक केली. काचा फोडून प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला.

बॉक्स :

३० नोव्हेंबरला झाले होते लग्न

मूर्तिजापूर येथील सालासार मंगल कार्यालयात अत्यंत आंनदाच्या वातावरणात ३० नोव्हेंबर २०२० रोजी काकड दाम्पत्याचे लग्न पार पडले. या दुर्घटनेमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त केल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांच्या होत्या.